क्रिकेट युद्ध : हिंदुस्थान-पाकिस्तान वन डेचं ठरलं !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ६ मे २०२३ ।  क्रिकेट विश्वातील दहा संघांमध्ये वन डे क्रिकेट वर्ल्ड कप येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये रंगणार आहे. पण ज्या सामन्याची अवघ्या जगाला उत्पंठा लागली आहे तो हिंदुस्थान-पाकिस्तान यांच्यातील ब्लॉकबस्टर सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळविण्याची तयारी बीसीसीआयने सुरू केल्याचे सूत्रांकडून कळले आहे. मात्र याबाबत बीसीसीआय आणि आयसीसीकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

पाकिस्तानविरुद्ध सामना खेळविण्यासाठी हिंदुस्थानातील सर्वात सुरक्षित आणि मोठय़ा स्टेडियमचा शोध बीसीसीआय घेत होता. हिंदुस्थानात नरेंद्र मोदी यांचीच सत्ता आहे आणि अहमदाबाद ही त्यांचीच राज्यभूमी आहे. त्यामुळे त्यांच्या नावाच्या स्टेडियमवर पाकिस्तानी संघाला सर्वोच्च सुरक्षा पुरविणे सोयिस्कर आहे. त्यातच हे स्टेडियम एक लाखापेक्षा अधिक आसनक्षमतेचे आहे आणि हिंदुस्थान-पाकिस्तान सामना पाहायला जगभरातील व्रेकेटप्रेमी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी स्टेडियमपेक्षा उत्तम पर्याय असूच शकत नाही. त्यामुळे बीसीसीआयने क्रिकेटमधील पारंपरिक युद्ध अहमदाबादेत खेळविण्याची आपल्या मनाची तयारी केली आहे.
क्रिकेट वर्ल्ड कपला आता केवळ पाच महिने उरले आहेत. पण अद्यापही बीसीसीआयने सामन्यांच्या तारखा आणि स्थळं निश्चित केलेली नाहीत. त्यामुळे जगभरातील क्रिकेटप्रेमी बीसीसीआय आणि आयसीसीवर टीका करत आहेत. 5 ऑक्टोबरपासून सुरू होणारा क्रिकेटचा पुंभमेळा हिंदुस्थानातील 13 क्रिकेट मैदानांवर खेळविला जाणार आहे. यात मुंबई, अहमदाबाद, नागपूर, बंगळुरू, दिल्ली, त्रिवेंद्रम, लखनौ, गुवाहाटी, हैदराबाद, कोलकाता, चेन्नई, राजकोट, इंदूर आणि धरमशाला ही ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. हिंदुस्थान 13 पैकी 7 ठिकाणी आपले सामने खेळणार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम