
माजी नगरसेवकाचा ८० हजारांचा मोबाईल चोरीला; परप्रांतीय महिलांविरुद्ध गुन्हा दाखल
माजी नगरसेवकाचा ८० हजारांचा मोबाईल चोरीला; परप्रांतीय महिलांविरुद्ध गुन्हा दाखल
प्रतिनिधी | जळगाव
शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजीपाला मार्केटमध्ये खरेदीसाठी आलेल्या माजी नगरसेवकाचा ८० हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरीला गेल्याची घटना शनिवारी (२४ मे) सकाळी घडली. याप्रकरणी परप्रांतीय चार महिलांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी नगरसेवक राजेंद्र झिपरू पाटील हे आपल्या कुटुंबासह शहरात वास्तव्यास आहेत. शनिवारी सकाळी ९.३० वाजता ते कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला विभागात खरेदीसाठी गेले असता, गर्दीचा फायदा घेत लल्ली रमजान जोगी (वय २७), पूजा रज्जू जोगी (दोघी रा. अमठी, उत्तर प्रदेश; ह.मु. ममता बेकरी, जळगाव) आणि त्यांच्या दोन अनोळखी साथीदार महिलांनी त्यांचा ८० हजार रुपये किंमतीचा महागडा मोबाईल फोन चोरून नेला.
घटनेनंतर राजेंद्र पाटील यांनी तत्काळ एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून चौघांविरोधात चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रामकृष्ण पाटील करीत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम