रिक्षातील प्रवाशाच्या खिशातून ७ हजार रुपये लंपास

बातमी शेअर करा...

रिक्षातील प्रवाशाच्या खिशातून ७ हजार रुपये लंपास

जळगाव: रिक्षात बसलेल्या एका प्रवाशाच्या खिशातून तीन अज्ञात व्यक्तींनी ७ हजार रुपयांची रोकड चोरल्याची घटना समोर आली आहे. ही घटना ४ सप्टेंबर रोजी दुपारी हातोळा बाजार ते रुख्माई टेन्ट हाऊस दरम्यान घडली असून, या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खालिद रसूल बागवान (वय ५६, रा. बागवानवाडा, जळगाव) हे दुपारी हातोळा मटन मार्केट परिसरातून एका रिक्षात बसले. त्यांच्या आधीच रिक्षात तीन अनोळखी इसम प्रवासी म्हणून बसलेले होते. रिक्षा रुख्माई टेन्ट हाऊसजवळ येईपर्यंत या तिघांनी चालाखीने बागवान यांच्या खिशातून ७ हजार रुपये काढून घेतले.

रिक्षातून उतरल्यानंतर बागवान यांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी तात्काळ एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलीस हवालदार चंद्रकांत पाटील हे पुढील तपास करत आहेत.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम