मंत्री पाटलांवर मनसेचे टीकास्त्र ; व्हिडीओ केला व्हायरल !
दै. बातमीदार । १२ एप्रिल २०२३ । राज्यतील भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानामुळे त्यांची आता चांगलीच गोची होत आहे. तर या वक्तव्याचा आता भाजपने हि त्याची वैयक्त्कीत टिपणी असल्याचे सांगितल्याने आता मंत्री पाटील एकटे पडले आहे. त्यामुळे सर्वच पक्षाचे नेत्यांनी त्यांच्यावर टीका सुरु केली आहे.
काय होते वक्तव्य ?
अयोध्येतील बाबरी मशीद पाडली, तेव्हा बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेना तिथे गेली होती? कारसेवक हे हिंदू होते. ते बजरंग दलाच्या नेतृत्वाखाली गेले होते. ज्यांनी बाबरी पाडली, ते शिवसैनिक नव्हते, असं वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. त्यांच्या या व्यक्तव्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. गोमूत्रधारी चंद्रकांत पाटील हे बाबरीच्या आठवणींच्या खंदकातून बाहेर पडले. जेव्हा बाबरी पडली, तेव्हा हे सगळे उंदीर बिळामध्ये लपले होते, अशा शब्दांत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल संताप व्यक्त केला.
त्यानंतर आता मनसेनेही ट्वीट करत पाटील यांच्या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. जोरदार टीका सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्रकांत पाटील यांना स्पष्टीकरण देण्यासाठी सांगितले. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी बाजू मांडत ते वक्तव्य बाळासाहेबांबाबत नसून संजय राऊत यांच्याबद्दल होते, अशी सारवासारव त्यांनी केली. बाळासाहेब ठाकरेंमुळे मुंबईत हिंदू जिवंत आहेत. बाबरी पडली, तेव्हा तेथे शिवसैनिक होतेच, पण भाजप किंवा शिवसेना पक्ष म्हणून ती पाडली गेली नाही, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.
अयोध्या रामजन्मभूमी आंदोलनात, बाबरीचा विध्वंस झाल्यानंतर उसळलेल्या धार्मिक उन्मादात जनतेसाठी अभेद्य ढाल बनलेल्या वंदनीय स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या प्रामाणिकपणावर, त्यांच्या शौर्यावर, धैर्यावर प्रश्नचिन्ह उभं करणाऱ्यांनी सन्मा. राजसाहेबांनी सांगितलेला हा प्रसंग जरूर ऐकावा ! pic.twitter.com/6AwTnGRdo2
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) April 11, 2023
तर मनसेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंट वर त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. मनसेच्या ट्वीटमध्ये व्हिडीओ असून बाबरी पाडल्यानंतर बाळासाहेबांनी केलेल्या वक्तव्याची आठवण राज ठाकरे यांनी करून दिली आहे. बाबरीचा विध्वंस झाल्यानंतर उसळलेल्या धार्मिक उन्मादात जनतेसाठी अभेद्य ढाल बनलेल्या वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या प्रामाणिकपणावर, त्यांच्या शौर्यावर, धैर्यावर प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्यांनी हा प्रसंग ऐकावा, असे त्यात म्हटले आहे.
तर ही भाजपची चाल असून हळूहळू त्यांना बाळासाहेबांचे महत्त्व लोकांच्या मनातून कमी करायचं आहे. मनावर ओझं ठेवून जो दगड बसवलेला आहे, तो आता जड व्हायला लागलाय, अशी परिस्थिती भाजपच्या इथल्या नेतृत्वाची आहे. बाळासाहेबांचा अपमान करताहेत, त्यांचे तळवे किती दिवस चाटणार आहात. आता कुणाला जोडे मारणार आहात, की स्वतः च स्वतःला मारणार आहात? बाळासाहेब आणि शिवसेनेचे नाव घेण्याचा तुम्हाला अधिकार नाही, अशी टीकाही उद्धव यांनी केली आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम