आदित्य ठाकरेंवर शिंदे गटाची घणाघाती टीका !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ११ फेब्रुवारी २०२३ । ठाकरे गटाचे नेते आ.आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेली टीका त्यांच्या विरोधकांना चांगलीच झोंबली आहे. त्यामुळेच आदित्य ठाकरे यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करू, अशी टीका सोलापूरमध्ये आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केली आहे.

आदित्य ठाकरे हे नेहमीच एकनाथ शिंदे यांना आव्हान देतात. त्यांनी आमदारचा राजीनामा देऊन आपल्यासोबत निवडणूक लढवावी, असे खुले आव्हान त्यांनी काहीच दिवसांपूर्वी दिले होते. शिवाय मुंबई महापालिकेत मुख्यमंत्र्यांचा कसा हस्तक्षेप होत आहे, याकडेही ते वारंवार लक्ष वेधत राहिले आहेत. आदित्य यांची ही आक्रमक भूमिकाच शिंदे सेनेला वारंवार अडचणीत आणीत आहे.

आदित्य यांच्या आक्रमक भूमिकेबद्दल आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना विचारले असता ते म्हणाले की, माझ्याकडे सध्या आरोग्य खाते आहे. माझ्याकडे सध्या चारच मेंटल हॉस्पिटल्स आहेत. त्यात कुठे रिकामा जागा तर त्याठिकाणी त्यांची नक्कीच नियुक्ती केली करू, अशी टीका त्यांनी केली आहे. तानाजी सावंत पुढे म्हणाले की, ज्यांच्या मेंदूवर परिणाम झालेला आहे, त्यांना लागलीच वेड्यांच्या रुग्णालयात दाखल करावे, असा सल्ला मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देणार असल्याचेही ते म्हणाले.

माढा तालुक्यातल्या वाकाव येथील श्री गुंडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धार सोहळ्याला ही सावंत यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. सावंत म्हणाले की, कोरोनाकाळात केवळ आपल्या देशाचाच नव्हे, तर इतर देशांतील जनतेचाही विचार करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विश्वनेता आहेत. त्यांना मी महादेवाचा अवतार मानतो. त्यांच्या नेतृत्वाखाली जगात भारताची वेगळी ओळख निर्माण होत आहे. सावंत पुढे म्हणाले की, अहोरात्र जनसेवेत गुंतलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ख्याती सर्वदूर पसरली असून गतिमान सरकार ते चालवत आहेत. जनतेच्या मनातील नवे सरकार घडवण्यात मी शिंदेंसोबत संस्थापक होतो, असा दावाही त्यांनी केला. दरम्यान, या आधी माजी मंत्री विजय शिवतारे यांनीही असाच दावा केला होता.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम