देशातील १९ बँकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ४ जून २०२३ ।  इन्फ्रास्ट्रक्चर लिझिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस (आयएल अँड एफएस) या कंपनीची उपकंपनी असलेल्या आयएल अँड एफएस टान्स्पोर्टशन कंपनीने देशातील प्रमुख १९ बँकांची तब्बल ६५२४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सीबीआयने कंपनी व संबंधित अशा एकूण सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

२०१६ ते २०१८ या कालावधीमध्ये कंपनीने हा घोटाळा केल्याचे सीबीआयने एफआयआरमध्ये नमूद केले आहे. कंपनीने केलेल्या घोटाळ्याचा प्रामुख्याने पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, येस बँक आणि अन्य बँकांना फटका बसला आहे. २०१८ साली कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली आहे.

कंपनीच्या संचालकांनी कंपनीची आर्थिक स्थितीशी निगडित कोणतीही कायदेशीर शिस्त पाळली नाही, कंपनीने समूहातील कंपन्यांतच मोठ्या प्रमाणावर चक्राकार पद्धतीने आर्थिक व्यवहार केले. सेबीने कंपनीला जे निर्देश दिले होते त्यांचेदेखील पालन कंपनीने केले नाही, असा आरोप कंपनीवर आहे. याखेरीज कंपनीने मोठ्या प्रमाणावर पैसे हे कोणत्याही नोंदीशिवाय फिरवल्याचे देखील तपासात आढळून आले आहे. तर, संचालकांच्या हितसंबंधांतील व्यक्ती व संस्था यांच्यासोबत कंपनीने व्यवहार केल्याचेही या प्रकरणात झालेल्या फोरेन्सिक ऑडिटमध्ये आढळून आले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम