स्टार क्रिकेटर शार्दुल ठाकूरच्या विवाहसोहळ्यात राडा !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २ मार्च २०२३ । गेल्या दोन दिवसापूर्वी २७ फेब्रुवारी रोजी टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर शार्दुल ठाकूर विवाहबद्ध झाला. शार्दुल ठाकूर याने त्याची लहानपणाची मैत्रीण मिताली पारुळकरसोबत सप्तपदी घेतल्या. मोजक्या जणांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला.

त्यामुळे सर्वांनाच इच्छा असूनही लग्नाला उपस्थित राहता आलं नाही. त्यामुळे शार्दुल आणि मिताली या दोघांनी पालघरमध्ये रिसेपशनचं आयोजन केलं. शार्दुलच्या या लग्नसमारंभाला गालबोट लागल्याचं समोर आलं आहे. या रिसेपशनमध्ये राडा झाल्याची माहिती समोर आली आहे.

भाजप नेते रविंद्र चव्हाण आणि भरत राजपूत यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हा राडा झाला आहे. भरत राजपूत हे डहाणू नगर परिषदेचे नगराध्यक्ष आहेत. शार्दुल ठाकूरच्या लग्नसमारंभात हा राडा झाला. मात्र या राड्यानंतर मध्यस्थीनंतर कार्यकर्ते शांत झाले. त्यामुळे पुढील वाद टळला. मात्र या दोन्ही गटांमध्ये राडा होण्याचं कारण समजू शकलेलं नाही.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम