बिपरजॉय चक्रीवादळ सरकतेय गुजरातकडे !
दै. बातमीदार । १३ जून २०२३ । देशात पावसाळा सुरु होण्याआधीच अरबी समुद्रात निर्माण झालेले बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातकडे सरकत आहे. हे वादळ 15 जूनला दुपारी कच्छ जिल्ह्यातील जखाऊ बंदरावर धडकणार आहे. आज कोकण- गोवा भागात तर 15 जूनला गुजरातमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आतापर्यंत 7500 लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. या दरम्यान 150 किमी/तास वेगाने वारे वाहू शकतात. त्याआधी, चांगली गोष्ट म्हणजे वादळाची तीव्रता कमी झाली आली आहे. असे असले तरी ते अजूनही धोकादायक आहे.
वादळामुळे गुजरातच्या किनारी भागात विजांचा कडकडाट आणि पाऊस सुरू आहे. त्यामुळे तिघांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. यातील दोन मुले भुज येथील असून, त्यांच्या अंगावर भिंत पडली, तर एका महिलेवर झाड पडले. गुजरातच्या कच्छ, पोरबंदर, द्वारका, जामनगर, जुनागढ आणि मोरबी या किनारी जिल्ह्यांतील वादळग्रस्त भागातून लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. आतापर्यंत 7500 लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. आजपासून 23 हजार लोकांना स्थलांतरित करण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे.
दुसरीकडे, अमित शाह आज दिल्लीत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मंत्र्यांची बैठक घेणार आहेत. बांगलादेशने या वादळाला ‘बिपरजॉय’ असे नाव दिले आहे. याचा अर्थ ‘आपत्ती’ किंवा ‘विपत्ती’ असा होतो. मंगळवारी सकाळी 6 वाजता हवामान खात्याच्या अपडेटनुसार, वादळ ताशी 8 किमी वेगाने उत्तर-पश्चिम दिशेने सरकत आहे. सोमवारी रात्री अडीच वाजता हे वादळ पोरबंदरपासून 290 किमी आणि जखाऊ बंदरापासून 360 किमी अंतरावर होते. हवामान विभागाच्या माहितीनुसार, चक्रीवादळ 14 जूनच्या सकाळपर्यंत उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे, त्यानंतर ते पुनरावृत्ती होईल आणि उत्तर-ईशान्य दिशेने सरकेल.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम