दादांना वाटते पाप केले ; ठाकरे गटाचा टोला !

advt office
बातमी शेअर करा...

बातमीदार | १५ सप्टेंबर २०२३ | राष्ट्रवादीत मोठी फुट पडून अजित पवारांनी आपल्या स्वतंत्र गट स्थापन केला आहे पण यावर विरोधक नेहमीच दादांचा समाचार घेत होते पण आज ठाकरे गटाच्या नेते संजय राऊत यांनी अजित पवारांना टोला लगावला आहे.

संजय राऊत म्हणाले कि, अजित पवारांना त्यांचं मन खातंय, आपण काही तरी पाप केलंय, गुन्हा केलाय, असं त्यांना वाटतं. त्यामुळेच शरद पवारांचा सामना करावा लागू नये, यासाठी ते आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमाला गैरहजर राहिले असतील, आजच्या शरद पवारांसोबतच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या गैरहजर राहण्याचा अजित पवारांनी चांगला निर्णय घेतला, असे म्हणावे लागेल. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या स्थापनेत शरद पवारांचा मोठा वाटा आहे. शरद पवारांमुळेच अजित पवार, दिलीप वळसे-पाटील या इन्स्टिट्यूटमध्ये संचालक आहेत. त्यामुळेच आता अजित पवारांना त्यांचं मन खात असेल. आपण काही तरी पाप केलंय, गुन्हा केलाय, असं त्यांना वाटतं असेल. त्यामुळेच ते आजच्या बैठकीला आले नसतील.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम