
जयंत पाटलांच्या ईडी प्रकरणी दादा बोलले !
दै. बातमीदार । १५ मे २०२३ । राज्यातील महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आयएल आणि एफएस प्रकरणी ईडीनं दुसऱ्यांदा समन्स बजावण्यात आलं आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मोठी माहिती दिली आहे.
जयंत पाटील यांना 22 मे रोजी चौकशीला हजर राहण्याची सूचना या समन्समध्ये करण्यात आली आहे. जयंत पाटील यांना गेल्या गुरुवारीच हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र त्यांनी वेळ वाढवून मागितला होता. आता पुन्हा एकदा त्यांना समन्स बजावण्यात आला आहे.
दरम्यान, अजित पवार माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी आज जयंत पाटील बरोबर पाच वाजता मीटिंग आहे. त्यांना आज भेटणार आहे. बातमी वाचली आहे. नक्की काय प्रकरण माहिती नाही. अशी माहिती अजित पवार यांना यावेळी दिली. पवार यांच्या या वक्तव्यामुळं दोघांच्या भेटीत नेमकी काय चर्चा होते याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. तसेच, महाराष्ट्रात काल अकोला आणि आ अहमदनगर येथे घडलेल्या दंगलीवरली अजित पवार यांनी भाष्य केलं. अकोलामधील दंगलीसंदर्भात आढावा घेतला आहे. दंगलीमागील मास्टरमाईंड कोण आहे हे शोधलं पाहिजे असं म्हणत राज्यातील दंगलीला राज्य सरकारने आवर घालावा, असा इशारा पवार यांनी यावेळी दिला.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम