पुण्यात पुन्हा ‘दादा विरुद्ध दादा’

बातमी शेअर करा...

बातमीदार | १५ नोव्हेबर २०२३

दिवाळीनिमित्त अनेक मोठ्या शहराचे विविध परंपरा असून पुण्यात देखील राजकीय परंपरा असणाऱ्या वाडेश्वर कट्ट्याचे आज दि.१५ रोजी आयोजन करण्यात आले होते. या वाडेश्वर कट्ट्यावर राजकीय पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले होते. या खास मैफिलीमध्ये भाजप नेते चंद्रकांत दादा पाटील यांच्यासह शहरातील सर्व राजकीय पक्षांचे शहराध्यक्ष हजर होते. यावेळी कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी अजित पवारांबद्दल केलेल्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

भाजप नेते मंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामधील कोल्ड वॉर काही लपून राहिले नाही. चंद्रकांत पाटील यांच्याकडे असलेले पुण्याचे पालकमंत्रीपद अजित पवारांकडे गेल्याने ‘दादा विरुद्ध दादा’ वाद सुरू झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अशातच पुण्यातील वाडेश्वर कट्ट्यावरील आयोजित कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याने पुन्हा एकदा दादाविरुद्ध दादा वाद रंगण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

अजित पवार यांनी दिवाळीनिमित्त गोविंदबागेत हजेरी लावली. यावर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी “पवार कुटुबाचं एक वैशिष्ट्य आहे. ते राजकीय दृष्ट्या अतिशिय चतुर, चलाख आणि धुर्त आहेत. त्यांच्या पोटात काय ते ओठावर येऊ देत नाहीत,” अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच अजित पवार हे नाराज आहेत असे वाटत नाही..’ असेही ते यावेळी म्हणाले.
दरम्यान, मराठा आरक्षणावर बोलताना चंद्रकांत दादा पाटील यांनी “मराठा बांधवांना २४ डिसेंबरपर्यंत थांबण्याची गरज नाही. कुणबी नोंदी असलेले दाखले मिळायला सुरवात झाली आहे. जशाजशा कुणबी नोंदी सापडतील तसे दाखले प्रचंड वेगाने दिले जात असल्याचे सांगितले आहे. तसेच “लाखो लोकांना कुणबी दाखले मिळतील, मात्र न्यायालयात टिकणारे आरक्षण मिळण्यासाठी वेळ लागेल…” असेही ते यावेळी म्हणाले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम