सावदा येथे दादागिरीचा बीमोड करणार -स.पो.नि विशाल पाटील
सावदा येथील एपीआय जार्लीदर पळे याची बदलीमुळे रिक्त झालेल्या जागी विशाल पाटील यांनी पदभार स्वीकारला सावदा शहरासह परिसरातील गुन्हेगारांची दादागिरीविरूध्द कायद्याचा प्रभावी वापर करून धडक कारवाई केली जाईल, कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असे विशाल पाटील यांनी सांगितले.
सावदा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत क्षेत्रांतील कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासोबत, अवैध धंदे सर्रासपणे ठिक ठिकाणी सुरु असून त्यात जुगार, सटटा, अवैध गावठी दारु., परिसरांत प्रतिबंधित गुटखा, पानमसाला खुलेआम विक्री होत असून त्यामुळे तरुण- तरुणी त्याचे आहारी गेल्याने अनेक जणांना प्राण गमावले लागले असून काही गंभीर आजारी आहेत. परिसरांत चोरीचे सत्र सुरु असून याबाबत तक्रार दाखल होऊनही अद्याप पर्यंत चोरीचा छळा लावण्यात पोलीसांना यश आलेले नाही. बसस्थानकांच्या परिसरांत बेशिस्तपणे पार्कीग करण्यात येत असून बसस्थानका मागील सोमेश्वर नगर, श्रीकृष्ण कॉलनी, भानुसरकार कॉलनी या कॉलनीतील नागरीकांना संध्याकाळी 5 ते 8 यावेळेत चालणे सुध्दा जिकरीचे होते तेथे असलेले लक्झरी बसेसचे अवैध थांबे इतरत्र हलवले आवश्यक आहे. रावेर रोड स्मशान भुमी ते फैजपूर रोड साईबाबा मंदिर पर्यंत वाहतुकीस वळण लावण्याची आवश्यकता असून तेथे एखादा अपघात होण्याची वाट न बघता, तात्काळ अवैध थांबे तात्काळ हटविणे आवश्यक आहे.
पोलीस स्टेशनच्या हद्यीत काही ठिकाणी जातीय दंगली झालेली असून त्या ठिकाणी जातीय सलोखा कायम टिकवून ठेवण्याचे तसेच सुस्त झालेल्या पोलीस यंत्रणेला, गुप्त वार्ता विभागाला कामाला लावण्याची अपेक्षा परिसरांतील जनेतून व्यक्त करण्यात येत आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम