सांगवी येथे श्री गुरु माऊली सेवानंदजी महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी

बातमी शेअर करा...

पारोळा – सांगवी येथील तीर्थक्षेत्री श्री गुरु माऊली सेवानंदजी महाराज यांची अकरावी पुण्यतिथी10.सप्टेंबर रोजी उत्साहात साजरी करण्यात आली.

त्या निमित्त कावड यात्रेचे स्वागत समाधी अभिषेक पुजन , पालखी मिरवणुक, रक्तदान शिबीर, भजन सत्संग व महाप्रसाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

श्री दादाजी धुनिवाले प्रतिष्ठान सांगवी तर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

दि 9 संप्टेबर रोजी सायंकाळी गुरु सेवानंदजी महाराज याच्या प्रतिमेची सांगवी गावातून वाजत गाजत पालखी मिरवणुक काढण्यात आली तर 10 संप्टेबर रोजी पहाटे समाधीचे अभिषेक व पुजन करण्यात आले. दरबारात रक्तदान शिबीर घेण्यात आले यावेळी रक्तदान शिबिराचे उदघाटन श्री दादाजी धुनिवाले मंडळाचे अध्यक्ष प्रदीप पाटील याच्या हस्ते सपत्नीक करण्यात आले.

यावेळी पारोळ्याचा माजी नगराध्यक्षा नलिनी पाटील, डॉ संभाजीराजे पाटील, आर्किटेक कल्पेश कलंत्री,अॅड मोहण शुक्ला, अॅड विलास मोरे, स्थानिक संरपच बाळु पाटील, नंथ्थू पाटील , जागृती पाटील, मीनाक्षी पाटील, वर्षा पाटील, सिमा ढगे, भारती वाघ, आदी उपस्थित होते .

या शिबिरात अनेक रक्तदात्यानी रक्तदान केले म्हणून त्यांचा प्रतिष्ठानच्या वतीने सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी विश्वस्त सदस्य फकिरा खोकरे, छोटु बडगुजर ,रमेश वाघ,अॅड किशोर पाटील, दिपक वाघ, अविनाश जडे, बन्सीलाल पाटील, राजेंद्र पाटील,दगा नाना पाटील, छोटु पाटील, डॉ ज्ञानेश्वर पाटील ,संदिप राजपुत, रमेश वाघ, बबलू पाटील, अण्णा पाटील, संजय फिरके सुनिल वारुळे, विक्की खोकरे, दादभाऊ पाटील, भुऱ्या पाटील, जिभाऊ पाटील, नरेश पाटील आदीनी कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी परीश्रम घेतले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम