बातमीदार | ९ ऑक्टोबर २०२३
गेल्या काही दिवसापासून दहशतवादी संघटना हमास व इस्त्राइल यांच्यात युद्ध पेटलं असून .याच्या झळा अनेक सामान्य नागरिकांना बसत आहेत. हमासने केलेल्या हल्ल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
हमासने नोव्हा म्युझिक फेस्टिव्हल वर केलेल्या हल्ल्याचे देखील काही व्हिडीओ समोर आले आहेत. या व्हिडीओमध्ये लोक जीव वाचवण्यासाठी पळताना दिसत आहेत. हमासच्या या हल्ल्यात सुमारे 260 लोक मारले गेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार रविवारी गाझा जवळील किबुट्झ रीइम जवळ हा म्युझिक फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला होता. ज्यूंचा सण सुक्कोटच्या समाप्तीनिमित्त साजरा करण्यात येत असलेल्या म्युझिक फेस्टिव्हलमध्ये सुमारे 3,000 लोक सहभागी झाले होते. ज्यामध्ये बहुतेक तरुण हे इस्रायली होते. इस्रायली रेस्क्यू सर्व्हिस झाकाने दिलेल्या माहितीनुसार त्यांनी या म्युझिक फेस्टिव्हलच्या ठिकाणाहून 260 मृतदेह बाहेर काढले आहेत.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मव एक्स वर या घटनेचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. आता व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हल्ल्याची भीषणता पाहायला मिळत आहेत. म्युझिक फेस्टीवलवरून क्षेपणास्त्रे डागली जात असल्याचे तसेच हमासच्या अतिरेक्यांनी इस्रायली प्रदेशावर हल्ला केल्याचे पाहायला मिळत आहे. दहशतवाद्यांनी या म्युझिक फेस्टिव्हलमध्ये सहभागी झालेल्यांना घेरले आणि गोळीबार करत कित्येकांना ठार केले. यानंतर, दहशतवादी परिसरात लपलेल्या नागरिकांचा शोध घेऊन त्यांना ठार केलं. तसेच अनेकांना ओलीस ठेवण्यात आलं, असे द टाइम्स ऑफ इस्रायल वृत्तापत्राने दिलेल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम