भाजपचा स्वभावाचा आणि वागणुकीचा पराभव : राज ठाकरे !
दै. बातमीदार । १४ मे २०२३ । देशातील कर्नाटक विधानसभा निवडणुकीत १३५ जागांवर विजय मिळवत काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला. कानडी जनतेने भाजपला नाकारले आहे. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कर्नाटक निकालावर भाष्य करत भाजपला सल्ला दिला आहे.
कर्नाटक मधील विजय हा राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा परिमाण आहे. तर कर्नाटकमधील भाजपचा पराभव हा स्वभावाचा आणि वागणुकीचा पराभव आहे. आपलं कोण वाकड करू शकतो असा जो विचार करतो त्याचा हा पराभव आहे. जनतेला लोकांना कधी गृहीत धरू नये. याचा सर्वांनीच बोध घेण्याची गरज आहे आणि तो सगळ्यांनी घ्यावा. अशा शब्दात भाजपला राज ठाकरेंनी सल्ला दिली आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकांचे निकाल शनिवारी जाहीर झाले. यात काँग्रेसने भाजपचा सुपडा साफ केला आहे. काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. 224 जागांच्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत 113 हा बहुमताचा आकडा आहे. त्याच्या खूप पुढे जात 135 जागांवर विजय मिळवत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष बनला आहे, तर विजयाचा दावा करणाऱ्या भाजपला कर्नाटकच्या जनतेने नाकारलं आहे. भाजपची 65 जागांवर घसरगुंडी झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही काँग्रेसचं अभिनंदन केलं आहे. तर कर्नाटकात यापुढे जोमाने काम करु असा विश्वास व्यक्त केला आहे. कर्नाटक निवडणुकीमधील विजयाबद्दल काँग्रेसचे अभिनंदन. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. कर्नाटकमध्ये आम्हाला पाठिंबा देणाऱ्यांचे आभार. भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या कठोर मेहनतीचे कौतुक आहे. आगामी काळात आम्ही कर्नाटकसाठी अधिक जोमाने काम करू असं ते म्हणाले आहेत.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम