देशाचे संरक्षण मंत्री कोरोना पॉझिटिव्ह !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २० एप्रिल २०२३ ।  देशात कोरोना कंट्रोलमध्ये आला असं म्हणता म्हणता आता पुन्हा एकदा देशात वेगानं पसरायला लागला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मास्कच्या गाइलाइन्स पुन्हा आल्या आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, संरक्षणमंत्र्यांना सध्या सौम्य लक्षणांसह होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. डॉक्टरांच्या पथकाने त्यांची तपासणी करून त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. राजनाथ सिंह यांनी बुधवारी दिल्लीतील माणेकशॉ सेंटरमध्ये झालेल्या कमांडर कॉन्फरन्समध्ये भाग घेतला. दुसरीकडे, राजनाथ सिंह आज 20 एप्रिल रोजी नवी दिल्लीत भारतीय वायुसेना कमांडर्सच्या परिषदेत सहभागी होणार होते. मात्र कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर ते आज या परिषदेत सहभागी होणार नाहीत.
भारतात एका दिवसात कोरोना विषाणूच्या संसर्गाची 12,591 नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर, देशात आतापर्यंत संक्रमित लोकांची संख्या 4.48 कोटी झाली आहे. गेल्या आठ महिन्यांत समोर आलेली ही सर्वाधिक रोजची प्रकरणे आहेत. त्याच वेळी, देशात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 65,286 वर पोहोचली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम