आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे आव्हान संपुष्टात
दै. बातमीदार । ११ मे २०२३ । चेन्नईने दिल्लीचा 27 धावांनी पराभव केलाय. यात प्रामुख्याने पथीराणा आणि दीपक चाहर यांच्या भेदक माऱ्याच्या जोरावरच हा पराभव झालेला आहे. तर चेन्नईने दिलेल्या १६८ दावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीचा संघ १४० धावांपर्यंत मजल मारु शकला. दिल्लीचा 11 सामन्यातील हा सातवा पराभव होय. दिल्ली 8 गुणांसह अखेरच्या स्थानावर आहे. सात पराभवामुळे दिल्लीचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे.
आयपीएलच्या सोळाव्या हंगामात दिल्लीची सुरुवात निराशाजनक झाली होती. दिल्लीने सुरुवातीचे पाच सामने गमावले होते. त्यानंतर दिल्लीला पहिला विजय मिळाला होता. ऋषभ पंत याच्या अनुपस्थितीत दिल्लीचा संघ कमकुवत जाणवत होता. फलंदाजी आणि गोलंदाजीत दिल्लीच्या संघाला चांगली कामगिरी करता आली नाही. डेविड वॉर्नर, ऋषभ पंत, मिचेल मार्श, मनिष पांडे, सर्फराज खान यांनाही चांगली कामगिरी करता आली नाही. डेविड वॉर्नर याने सुरुवातीला धावा केल्या पण स्ट्राईक रेट खूपच कमी होता. दिल्लीचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपलेले आहे.
दिल्ली या संघाचे गणित बिघडवणार ?
दिल्लीला 11 सामन्यात सात पराभवाचा सामना करावा लागलाय. त्यामुळे दिल्लीचे आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आलेय. पण दिल्ली इतर संघाचे प्लेऑफमधील गणित बिघडवू शकते. दिल्लीचे अद्याप तीन सामने बाकी आहेत. यापैकी दोन सामने पंजाबविरोधात आहेत.. तर एक सामना चेन्नईसोबत आहे. 13 मे आणि 17 मे रोजी दिल्ली पंजाबसोबत भिडणार आहे. 20 मे रोजी दिल्ली पुन्हा एकदा चेन्नईसोबत दोन हात करणार आहे.
दिल्लीच्या पराभवाची कारण काय आहेत ?
डेविड वॉर्नर याचा अपवाद वगळता दिल्लीच्या एकाही फलंजाला मोठी धावसंख्या उभरता आली नाही. मिचेल मार्श, रोवमन पॉवेल, यश धुल, मनीष पांडे यांच्यासारखे फलंदाज अपयशी ठरत आहेत. दिल्लीच्या पराभवाचे हेही प्रमुख कारण असू शकते. डेविड वॉर्नर याला प्रभावी नेतृत्व करता आले नाही. दिल्लीच्या पराभवाचे खराब नेतृत्व हेही एक कारण आहे. वॉर्नरने गोलंदाजांचा योग्य वापर केला नाही. कुलदीप यादव याला कधी गोलंदाजी द्यायची, यात वॉर्नरची मोठी चूक होतेय.. गतवर्षी कुलदीपने सर्वाधिक विकेट घेतल्या होत्या… त्याशिवाय भन्नाट फॉर्मात असलेल्या अक्षर पटेल याला फलंदाजी बढती दिली जात नाही.. अन्यथा तो आणखी धावा जमवू शकेल. प्रमुख गोलंदाजांना धावा रोखण्यात अपयश आले आहे. अक्षर पटेल आणि कुलदीपचा अपवाद वगळता एकाही गोलंदाजाला धावा रोखता आल्या नाहीत. एनरिख नॉर्खिया लयीत दिसत नाही.. याचा फटका दिल्लीला बसत आहे. ऋषभ पंतची कमी दिल्लीला जाणवत आहे. ऋषभ पंतचे आक्रमक नेतृत्व आणि फलंदाजीची कमी दिल्लीला जाणवतेय.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम