राज्यात पोलिस भरतीच्या मैदानी चाचणीवेळी एका उमेदवाराचा दुर्दैवी मृत्यू !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १७ एप्रिल २०२३ ।  राज्यात बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असतांना राज्य सरकारने पोलीस भरतीची जाहीर केली होती. त्यात आता मैदानी चाचणी सुरु असतांना एका उमेदवाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी बातमी समोर आल्याने पोलीस भरती चाचणी देणाऱ्या तरुणामध्ये खळबळ उडाली आहे.

रविवारी पोलिस भरतीच्या मैदानी चाचणीवेळी एका उमेदवाराचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सचिन कदम असे या मृत उमेदवाराचे नाव आहे. बीकेसी येथे पोलिस भरती दरम्यान मैदानी चाचणी सुरू आहे. या भरती प्रक्रियेत सचिन हे सहभागी झाले होते.

मैदानी चाचणीवेळी धावताना सचिन मैदानात कोसळला त्यानंतर त्यांना उपचाराकरता जवळील शासकिय रुग्णालय व्हि एन देसाई याठिकाणी दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान सचिन कदम या उमेदवाराचा मृत्यू झाला आहे. सचिन कदम हा कल्याणहून पोलिस भरतीसाठी आल्याची माहिती आहे. या प्रकरणी बीकेसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम