कर्नाटक निवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १४ मे २०२३ ।  कर्नाटक विधानसभेत २२४ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत यंदा काँग्रेसला १३५ जागांसह स्पष्ट बहुमत मिळालं असून भाजपाला मोठा फटका बसला आहे. यात ६६ जागा मिळाल्या आहे. धर्मनिरपेक्ष जनता दलाला १९ जागेवर समाधान मानावे लागले आहे. सन 2018 च्या तुलनेत काँग्रेसच्या मतदार टक्केवारीत सुमारे पाच टक्क्यांनी वाढ होऊन ती 43 टक्के झाली. तर भाजपाची टक्केवारी किरकोळ घसरुन 36 टक्के राहिली.

या निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तीन उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. महत्त्वाचं म्हणजे या तिन्ही उमेदवारांना आपलं डिपॉझिट राखता आलं नाही. उद्धव ठाकरे गटाने रोण, विजापूर आणि खानापूर मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले होते. या तिन्ही उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहेत. त्यापैकी दोन उमेदवारांना 200 मतंही मिळवता आली नाहीत.

विजापूर शहर मतदारसंघातील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार सतीश पाटील यांना अवघे 149 मते मिळाली. दक्षिण कर्नाटकतल्या गदग जिल्ह्यातील रोण या मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार कुमार अंदप्पा हकारी यांना 122 मते मिळाती. तर सर्वाधिक 983 मते बेळगाव जिल्ह्यातील खानापूर मतदारसंघामधील कृष्णाजी पाटील यांना मिळाली. एबीपी माझाने याबाबत वृत्त दिले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम