उपमुख्यमंत्री फडणवीस व शरद पवार आज एकाच व्यासपीठावर !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १३ ऑगस्ट २०२३ | राज्यातील शिंदे व फडणवीस यांच्या सरकारमध्ये अजित पवार सामील झाल्यानंतर मोठी राजकीय घडामोड झाली होती. त्यानंतर पहिल्यांदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हे एकाच मंचावर येणार आहेत. शेतकरी कामगार पक्षाचे दिवंगत नेते व सांगोल्याचे आमदार राहिलेले भाई गणपतराव देशमुख यांच्या स्मारकाचे अनावरण आज होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सध्या तरी एकमेकांच्या विरोधात असलेले हे नेते एकत्र येत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रथमच दोघेच आमने-सामने दिसणार आहेत. यापूर्वी पुण्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात हे दोन्ही नेते एकाच मंचावर होते. मात्र, यावेळी पंतप्रधानांसोबत राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार वगैरे सर्वचजण उपस्थित असल्याने या शासकीय कार्यक्रमात टोलेबाजी पाहायला मिळाली नव्हती. त्यामुळे आजच्या कार्यक्रमात दोघेही काय बोलणार? याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम