उपमुख्यमंत्री फडणवीसांची महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीकास्त्र !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २६ मे २०२३ ।  राज्यात भाजप व महाविकास आघाडीची सुरु असलेल्या आरोप प्रत्यारोपाच्या फेरीत आता उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी उडी घेतली असून त्यांना आता थेट संजय राऊत आणि नाना पटोले हे दोन्ही लोक बोलघेवडे लोक आहेत. अशी टीका केली आहे. दोघांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याची मला आवश्यकता वाटत नाही. असे फडणवीस म्हणाले. अहमदनगरमध्ये आयोजित कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होईल, असा प्रश्न विचारला असता फडणवीस म्हणाले की, लवकरच मंत्रीमंडळाचा विस्तार होईल. असे बोलून त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला बगल दिली.

कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री राम शिंदे यांच्यात वाद आहे, असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर फडणवीस म्हणाले की, असे काहीही नाही. आणि असे काही असेल तर मी बसलेलो आहे. त्यांच्यात समन्वय घडवून आणला जाईल. दुसरी बाब म्हणजे वाद असला तरी वादळ नाही, एवढे मात्र नक्की आहे.
जलजीवन मिशन योजनेची कामांना केंद्राने निधी दिला. परंतू त्याचे सर्व टेंडर हे महाविकास आघाडीच्या काळात निघाली आहे. त्यामुळे या कामात काही घोटाळा झाला असेल तर त्याची चौकशी केली जाईल, असे प्रतिपादन देवेंद्र फडणवीस यांनी केले.

शिंदे गटाचे खासदार गजानन किर्तीकरांनी कुठेही युतीवर भाष्य केलेले नाही. या सर्व कपोलकल्पित बातम्या आहेत. जागावाटपाबाबत कोणतेही चर्चा नाही. जेव्हा चर्चा निर्णय होईल. तेव्हा तुम्हाला कळविले जाईल. आमच्या युतीत कोणताही वाद नाही. असे फडणवीस म्हणाले. शिंदे सेनेकडून लोकसभेसाठी 22 जागांचा दावा केला जातोय? असा प्रश्न फडणवीस यांना केल्यावर ते म्हणाले की, आता कोणतेही चर्चा नाही. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. पत्रकारांनी संजय राऊत यांच्या प्रतिक्रियांवर प्रश्न करताच फडणवीस यांनी दोन वेळा कोण संजय राऊत, कोण संजय राऊत असे म्हणत प्रश्नाला बगल दिला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम