उपमुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २६ फेब्रुवारी २०२३ । मुंबईतील विकासकामांच्या श्रेयावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. मुंबईतील कोणताही प्रकल्प आम्ही हाती घेतला तर मीच हे काम केले असा दावा केला आहे. जे लोक अडीच वर्षांच्या कार्यकाळात दोन वर्षे दरवाजाच्या आतच होते. त्यांनी 6 महिन्यांच्या काळात काय विकास केला? तुम्ही काहीच केले नाही म्हणून तर आज मुंबईची ही अवस्था झाली आहे.

एखाद्याला पोरगा झाला तरी माझ्यामुळेच झाला, कोणाचे लग्न झाले तरी माझ्यामुळेच झाले, नोकरी लागली तरी माझ्यामुळेच लागली. एखाद्याला सवयच असते काहीही केले तरी मीच केले म्हणतात. असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. मुंबईच्या कायापालट प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याचे भूमिपुजन आज करण्यात आले. यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, महापालिका बँकेत पैसा गुंतवून त्यांच्या इंटरेस्टवर जगण्यासाठी निर्माण झाली नाही. तर महापालिका जनतेचा पैसा जनतेच्या कल्याणासाठी वापरण्याकरीता असते. म्हणून जनतेचा पैसा जनतेसाठी लावा, असे निर्देश महापालिका आयुक्तांना दिले. मुंबईतील ज्या समस्या आहेत. त्या दूर कशा करता येईल याचे प्रकल्प आम्ही सुरू केले आहेत.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, दर पावसाळ्यात किंवा त्या दरम्यान तीन ते चार महिने माध्यमांमध्ये केवळ मुंबईतील खड्ड्यांची चर्चा असते. मुंबईच्या खड्ड्यांवर जेवढे मिम्स तयार होतात, तेवढे कोणत्याही गोष्टीवर होत नाही. ज्या महापालिकेकडे इतका पैसा आहे. 25 वर्ष राज्य करूनही रस्ते दुरुस्त करता येत नाही, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. येणाऱ्या 2 वर्षांमध्ये खड्डेमुक्त मुंबई होणार. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात दोन वर्षात हे काम होऊ शकते तर 25 वर्ष राज्य करणाऱ्यांना सवाल का विचारू नये? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी उपस्थित केला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम