उपमुख्यमंत्री फडणवीसांचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही ; शरद पवार !
दै. बातमीदार । ६ डिसेंबर २०२२ । राज्यात आज सकाळपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर मोठा वाद निर्माण झाल्याने मोठ्या वाहनावर हल्ला करण्यात आला असून महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगावात येऊ न देण्याची भूमिका घेतलेल्या कन्नड रक्षण वेदिके या संघटनेने हा हल्ला केला आहे. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावमध्ये रास्ता रोको आंदोलन केलं. हिरबागेवाडी येथील टोलनाक्यावर महाराष्ट्राच्या सहा वाहनांवर या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचेप्रमुख शरद पवार यांनी आता यावर प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार म्हणाले की, बेळगावात मराठी लोक दहशतीत आहेत. सीमा प्रश्नावर निर्णय घेण्याची वेळ आली आहे. बेळगावमध्ये जे काही घडलं ते निषेधार्ह आहे. हे प्रकरण मागील आठवड्यापासून वेगळ्या स्वरुपात पुढं करण्याचा जाणीवपूर्णक प्रयत्न कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा आहे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी २० नोव्हेंबरला जतबाबत भूमिका मांडली. २४ नोव्हेंबर रोजी अक्कलकोटबाबत भूमिका मांडली. तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही, असं म्हटलं.
दरम्यान कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी वादग्रस्त भूमिका घेतली आहे. त्यामुळेच सीमाभागातील परिस्थिती गंभीर झाली आहे. आम्ही या प्रश्नावर अनेकदा लाठ्या काठ्या झेलल्या. सत्यग्रह केला. त्यामुळे मला या प्रश्नाची चांगली जाण आहे. मात्र बोम्मई यांच्या वक्तव्यांमुळेच ही परिस्थिती बिघडल्याचं शरद पवार यांनी नमूद केलं.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम