फडणवीस अपमान सहन करून उपमुख्यमंत्री ; संजय राऊत !
दै. बातमीदार । २६ एप्रिल २०२३ । शिवसेना- भाजप युतीचे पुढचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच असतील, असे स्पष्टीकरण मंगळवारी ता. २५ सोलापूर येथे पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी दिले. त्यावर देवेंद्र फडणवीस हे खोटे बोलत आहेत. त्यांच्या अंतरंगात काय आहे, हे आम्हाला माहिती आहे, असा टोला संजय राऊतांनी लगावला.
देवेंद्र फडणवीस हे अपमान सहन करून राज्याचे उपमुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीसांचे अंतरंग नुसते धगधगत आहे, असा टोला ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी लगावला आहे. आज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, उपमुख्यमंत्रीपदामुळे देवेंद्र फडणवीसांच्या मनात काय वेदना आहेत, हे जवळच्या लोकांना माहिती आहे. आम्हीही त्यांच्या जवळचे आहोत. फडणवीसांचे अंतरंग नुसते धगधगत आहे. त्यांचे अंतरंग नुसते धगधगत आहे.
राज्यात काही ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी राज्याचे भावी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचे पोस्टर्स लावले आहेत. त्यावर काल सोलापूर येथे पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात 2024 ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातच निवडणुका लढविल्या जातील. पुढचे मुख्यमंत्रीही एकनाथ शिंदे हेच असतील. भावी मुख्यमंत्री म्हणून माझे पोस्टर लागले असतील तर ते चुकीचे आहे, असेही फडणवीस म्हणाले. तसेच, यापुढे भाजपच्या कार्यकर्त्यांनी असे करू नये, असेही देवेंद्र फडणवीसांनी बजावले. मात्र, देवेंद्र फडणवीस हे खोटे बोलत आहेत, असा टोला आज संजय राऊतांनी लगावला.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम