देसाईनी दिली होता मुलांना शेवटचा सल्ला !
बातमीदार | १० ऑगस्ट २०२३ | राज्याला हादरवून टाकणारी घटना गेल्या काही दिवसापूर्वी घडली होती. प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या अकस्मात मृत्यूमुळे मनोरंजन सृष्टी अनेकांना याच मोठा शॉक लागला होता. त्यांच्या कुटुंबियांसाठी तर हा मोठा धक्का होता, ते तर अक्षरश: कोसळले. गेली अनेक दशके मराठी, हिंदींतील विविध चित्रपटांचे भव्यदिव्य सेट उभारणाऱ्या नितीन देसाई यांना अनेक महत्वपूर्ण पुरस्कार मिळाले होते.
मुंबईत राहून एन.डी.स्टुडिओचे कामकाज सांभाळायचे तर त्यांची मुलं परदेशात होती. आयुष्यात हेच कर आणि तेच कर असं नितीन देसाई यांनी कधीच त्यांच्या मुलांना सांगितलं नाही किंवा कोणत्याही गोष्टीसाठी त्यांच्यावर दबाव टाकला नाही. त्यांची छोटी मुलगी तन्वी ही फॅशन डिजायनिंगचे शिक्षण घेत असून 12 नंतर ती पुढील शिक्षणासाठी लंडनला गेली. तेथे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील अभ्यासासाठी ती अमेरिकत गेली आणि शिकता-शिकता ती तिचे कामही सांभाळत आहे.
काही महिन्यांपूर्वी नितीन देसाई यांनी त्यांची लेक मानसी हिचे तिचा बॉयफ्रेंड जॉर्डनसोबत धूमधडाक्यात लग्न लावून दिलं होतं. त्यांच्या जवळच्या लोकांच्या सांगण्यानुसार, मुलांनी आपली बिझनेसमध्ये मदत करावी, यासाठी नितीन देसाई यांनी त्यांच्या मुलांवर कधीच दबाव टाकला नाही. तुमचं आयुष्य एन्जॉय करा, खूप शिका, मी आहे तोपर्यंत तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही, असां त्यांनी मुलांना सांगितलं होतं. मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत काम करत राहीन, पण तुम्ही जे ज्ञान मिळवाल त्याचा स्वत:साठी आणि समाजासाठीही उपयोग करा, असा सल्लाही नितीन यांनी त्यांच्या मुलांना दिला होता.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम