‘धर्मवीर’ नंतर ‘बाळासाहेबांचा राज’ ; २३ रोजी होणार शुभारंभ !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १७ जानेवारी २०२३ । राज्यात स्व. आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर’ सिनेमा सुपरहिट झाल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले होते त्यानंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी मोठी घोषणा करीत म्हणाले होते कि ‘धर्मवीर – २’ लवकर येणार तत्पूर्वी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आयुष्यावरील कलाकृती प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘बाळासाहेबांचा राज’ हे नाटक रंगभूमीवर येणार आहे. या दोन अंकी नाटकाचा शुभारंभ हिंदूहृदयसम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त सोमवार दिनांक 23 जानेवारीला होणार आहे. मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिरात दुपारी ४.३० वाजता या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग रंगणार आहे.

मकर संक्रातीच्या शुभ मुहूर्तावर या नाटकाच्या सन्मानिकेचे उदघाटन मनसे नेते,माननीय श्री.बाळा नांदगावकर साहेब त्याच्या शुभहस्ते झाले. याशिवाय नाटकाच्या पोस्टरचे उदघाटन मनसे ठाणे/पालघर जिल्हाध्यक्ष माननीय श्री.अविनाश जाधव साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी नाटकातील कलाकार सचिन नवरे, प्रफुल आचरेकर, नितीन बोढारे हजर होते. याशिवाय लेखक/दिग्दर्शक अनिकेत बंदरकर असे मान्यवर उपस्थित होते.

२३ जानेवारीला मुंबईत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग दणक्यात रंगणार आहे. शुभारंभाचा प्रयोगाला राजकीय आणि मनोरंजन विश्वातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. प्रमोद गांधी यांनी या नाटकाची निर्मिती केली आहे. इतर काही सिनेमांमध्ये ठाकरे कुटुंबाशी संबंधित असणाऱ्या कलाकृती साकारण्यात आल्या आहेत. आता ‘बाळासाहेबांचा राज’ नाटकाच्या निमिताने मराठी रंगभूमीवरही असाच एक नवा प्रयोग होताना दिसतोय. पहिल्यांदाच रंगभूमीवर बाळासाहेब आणि राज यांच्यातील भावनिक नातं नेमकं कसं होतं ते रसिक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. खास गोष्ट म्हणजे इतर व्यावसायिक नाटकांसारखे या नाटकाचे सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रभर प्रयोग रंगणार आहेत. या नाटकाला प्रेक्षक कसा प्रतीसाद हे लवकरच स्पष्ट होईल.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम