धोनीने केले नववर्षाचे स्वागत दुबईत ; व्हिडीओ झाला व्हायरल !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १ जानेवारी २०२३ नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी काही तरी नवीन ठिकाणी जात आपण स्वागत करीत असतो. तसेच भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने दुबईत कुटुंबासोबत नवीन वर्ष साजरे केले. संपूर्ण जग २०२३ चे स्वागत करत आहे आणि उत्सवात मग्न आहे. टीम इंडियाचा विश्वविजेता कर्णधार महेंद्रसिंग धोनीही या जल्लोषात मग्न झाला.

साक्षी सिंह धोनीने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये महेंद्रसिंग धोनी दुबईमध्ये नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी फटाक्यांची आतीषबाजी करत आहे. त्यांच्या मांडीत मुलगी जीवा धोनी असून दोघेही फटाक्यांची आतीषबाजी करत आहेत.टीम इंडियाच्या अनेक स्टार्सनी आपल्या कुटुंबियांसोबत नवीन वर्ष साजरे करतानाचे फोटो शेअर केले आहेत.

 

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आपल्या कुटुंबासह मालदीवमध्ये आहे, तर विराट कोहलीही यूएईमध्ये आहे.टीम इंडियाला आता 3 जानेवारीपासून श्रीलंकेविरुद्ध टी-20 मालिका खेळायची आहे. त्या मालिकेत रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुलसारखे वरिष्ठ खेळाडू नसले तरी. भारताला श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिकाही खेळायची आहे, ज्यामध्ये वरिष्ठ खेळाडू परततील.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम