राहुल गांधींची थेट शिवरायांशी तुलना ; वाद पेटणार !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २४ मे २०२३ ।  देशात पुन्हा एकदा कॉंग्रेसच्या त्या एका व्हिडीओमुळे राजकीय वाद पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही तर भाजपने या व्हिडीओवर टीकास्त्र सोडले आहे. काँग्रेसने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलरवर राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे. या व्हिडीओला छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवरील गाणं लावण्यात आलं आहे. या व्हिडीओतून राहुल गांधींची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्याचा गंभीर आरोप भाजपने केला आहे.

काँग्रेसककडून ट्विट केलेल्या या व्हिडिओवर भाजपने आक्षेप घेत व्हिडिओ तातडीने डिलीट करण्याची मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. व्हिडिओ डिलीट करून काँग्रेसने महाराष्ट्राची माफी मागावी असंही बावनकुळे यांनी म्हंटलं आहे. त्यामुळे आता या व्हिडिओवरुन महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

काँग्रेसने महाराष्ट्र आणि देशाची माफी मागावी, अशी माागणी चंद्रशेखर बावनकुळेंनी केली आहे. राहुल गांधी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणे हे वेदनादायी आहे. हा व्हिडीओ डिलीट करा आणि माफी मागा. जर व्हिडिओ डिलीट केला नाही तर आंदोलन करण्यात येईल असंही बावनकुळे म्हणाले आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम