सोशल मिडीयावर ‘इंडिया लॉकडाउन’ चीच चर्चा ?

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १० नोव्हेबर २०२२ सध्या ट्विटर आणि सोशल मिडियावर ‘इंडिया लॉकडाउन’ ही सर्वाधिक ट्रेंडला आहे. गतकाळातील घटनांची धास्ती अजूनही मनाभोवती असल्याने या चित्रपटाविषयी प्रेक्षकांना प्रचंड कुतूहल आहे. एवढेच नव्हे तर विनोदी मिम्स देखील बनवले जात आहे.

बॉलीवुड दिग्दर्शक मधुर भंडारकर यांचे चित्रपट म्हणजे आपल्या जीवनातील वास्तव परखडपणे समोर मांडणारे असतात. मग तो “चांदणी बार” असो किंवा ”पेज ३” या सर्व चित्रपटातील कथा आपल्या जीवनावर आधारित असतात. आता मधुर भंडारकर पुन्हा घेऊन येत आहेत आपण सगळ्यांनीच अनुभवलेल्या या भयाण वास्तवाची कहाणी म्हणजेच.. ‘इंडिया लॉकडाउन’ हा चित्रपट. सध्या सर्वत्र याच चित्रपटाची चर्चा आहे.

 

‘इंडिया लॉकडाउन’ या चित्रपटाचा पहिला टीझर रिलीज झाला आहे. २०२० मार्च मध्ये संपूर्ण जगावर कोरोनाचे महासंकट आले होते. आणि त्या दरम्यान भारताची परिस्थिती बिकट झाली होती. करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पहिल्या लाटेदरम्यान भारत सरकारने अचानक २१ दिवसांसाठी संपूर्ण लॉकडाउन घोषित केले. त्यानंतर लोकांची अक्षरशः अन्नानदशा झाली. मजूर शहर सोडून पळाले. त्यावेळी झालेल्या भीषण घटनांचे दर्शन घडवणारा हा चित्रपट आहे. सध्या सर्वत्र याच चित्रपटाची चर्चा आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम