मनसेतील वाद आले बाहेर ; मोरेंवर घेतला आक्षेप !
दै. बातमीदार । २७ जानेवारी २०२३ । गेल्या सहा महिन्यापासून मनसेचे पुण्यात अंतर्गत वाद चव्हाट्यावर नेहमी येत आहे. यावर राज ठाकरे यांच्याकडून कुठलाही मार्ग निघालेला दिसत नाही अशातच मनसेवर नाराज असलेले वसंत मोरे यांना आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे बारामती मतदारसंघात मनसेची ताकद वाढवण्यासाठी काही दिवसांपूर्वी वसंत मोरे यांना निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
दोन दिवसांपूर्वी वसंत मोरे यांच्या निरीक्षणाखाली भोर, वेल्हा आणि मुळशी तालुक्यांसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये नवीन पदाधिकाऱ्यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु या नियुक्तीनंतर भोर तालुक्याचे मनसेचे माजी तालुका प्रमुख राहुल पवार यांनी वसंत मोरे यांच्यावर गंभीर आरोप करत नियुक्तीवर आक्षेप घेतला आहे.
राहुल पवार यांनी सांगितले, भोर तालुक्यातील अध्यक्षाची नियुक्ती करताना वसंत मोरे यांनी निष्ठावंतांना डावलून नात्यातील निकटवर्तीयांना अध्यक्षपद दिल्याचा आरोप केला आहे. भोर तालुक्यात अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या दिपक पांगारे यांची मुलाखत वसंत मोरे यांनी मुंबईला जाण्याच्या आदल्या दिवशी त्यांच्या घरी घेतली, असा आरोप पवार यांनी केला आहे. ते पुढे म्हणाले, सतरा वर्षे काम करुनही निष्ठेचं फळ मिळेत नसल्याने जुन्या कार्यकर्त्यांमध्ये गैरसमज निर्माण होत आहे. राज ठाकरे यांना यामध्ये लक्ष घालावे अशी मागणी राहुल पवार यांनी केली. त्यामुळे नव्याने करण्यात आलेल्या अध्यक्ष यांच्या नियुक्त्यांनंतर पुण्यात मनसेमध्ये पुन्हा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम