जळगाव जनता बँकेतर्फे महिलांना पिंक रिक्षा वितरण

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार | २७ सप्टेंबर २०२२ | महिलांना स्वावलंबी होण्यासाठी मदत करणे व त्यांच्या आर्थिक उत्थानासाठी सहाय्य करणेसाठी जळगाव जनता सहकारी बँक व मराठी प्रतिष्ठान मोलाचे कार्य करीत आहे. सामाजिक जाणीवेतून महिलांना पिंक रिक्षेसाठी कर्ज उपलब्ध करुन देऊन महिलांच्या कर्तृत्वाला सलाम करण्याचे काम जळगाव जनता सहकारी बँकेने व मराठी प्रतिष्ठान करत आहे. असे गौरोवदगार जळगाव जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी आज जळगाव जनता सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयात आयोजित कार्यक्रम प्रसंगी काढले.

BJP add

जळगाव शहरातील महिलांना पिंक रिक्षा घेण्यासाठी जळगाव जनता बँकेच्या वतीने अल्प व्याजदरात कर्ज उपलब्ध करुन देण्यात आले. आहे सदर महिलांना पिंक रिक्षा वितरीत करण्यासाठी जळगाव जनता बँक व मराठी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रमुख अतिथी म्हणुन डॉ. प्रविण मुंढे बोलत होते. याप्रसंगी व्यासपिठावर महापौर जयश्री महाजन, प्रादेशिक परीवहन अधिकारी श्याम लोही, महापालिका आयुक्त विद्या गायकवाड, बँकेचे अध्यक्ष अनिल राव सर, मा संचालक सतिष मदाने, महावीर ज्वेलर्सचे संचालक अजयकुमार ललवाणी, निर्मल सिड्सच्या संचालिका श्रीमती वैशाली सुर्यवंशी, जैन उद्योग समुहाच्या श्रीमती ज्योतीभाभी जैन, उद्योजक सुबोध चौधरी उपस्थित होते.

आपण समाजाचे देणे लागतो या भावनेने बँकेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अविनाश आचार्य यांनी बँकेची स्थापना केली व त्याच संकल्पनेवर आधारीत बँकेचे कार्य आज देखिल सुरु आहे. असे उदगार बँकेचे अध्यक्ष प्राचार्य अनिल राव यांनी यावेळी बोलतांना काढले उप विभागीय परिवहन अधिकारी शाम लोही यांनी महिला या सबला असुन कोणत्याही क्षेत्रात मागे नाही, रिक्षा चालवितांना कोणतीही अडचण आल्यास पोलिसांच्या वतीने सर्वांना सहकार्य मिळेल निश्चिंत मनाने आपला व्यवसाय करा आमचा पाठींबा आहे तसेच पिंक ॲटो रिक्षा स्टॉपसाठी रेल्वे स्टेशन व बस स्टँड असे दोन ठिकाणी थांबा राहतील असे सांगितले मराठी प्रतिष्ठानचे जमिल देशपांडे यांनी महिलांना स्वावलंबी करण्या मागची प्रतिष्ठानची भूमिका स्पष्ट केली. व पुढील काळात जळगाव शहरात शंभर रिक्षा वितरीत करणार असल्याचे सांगितले या वेळी महापौर जयश्री महाजन, म न पा आयुक्त विद्या गायकवाड, यांचे यथोचित भाषणे झाली या वेळी पिंक रिक्षा घेणार्‍या महिलांमधुन माधुरी भालेराव व माधुरी निळे यांनी प्रातिनिधीक स्वरुपात मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेचे मुख्य कार्यकारी श्री पुंडलिक पाटील यांनी केले. त्यात त्यांनी बँकेने महिलांसाठी जाहिर केलेल्या विविध योजनांबद्दल माहिती दिली.

या प्रसंगी अतुल ॲटो लि चे गोपाल पुजारा, मराठी प्रतिष्ठान चे अध्यक्ष जमिल देशपांडे व सचिव विजय वाणी तसेच आर टी ओ इन्स्पेक्टर श्रीमती श्वेता पाटील, श्रीमती नीलम सैनानी, श्रीमुती मयुरी चौधरी तसेच संजय प्रभुदेसाई, सुशील हासवाणी, हिरालाल सोनवणे, विद्याधर नेमाने, बँकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय नागमोती, महाव्यवस्थापक सुनिल अग्रवाल शहारातील विविध शाखांचे शाखाधिकारी, मुख्य कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते सूत्रसंचालन शिल्पा जोशी, स्वाती भावसार व वैशाली महाजन यांनी केले तर आभार बँकेचे उपमहाव्यवस्थापक नितीन चौधरी यांनी मानले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम