जिल्हास्तरीय शांतता कमिटीची बैठक संपन्न

सार्वजनीक गणेशोत्सव उत्सव २०२२

बातमी शेअर करा...

औरंगाबाद दि. 25 ऑगस्ट |  आज जिल्हास्तरीय शांतता कमिटीचे आर्यभट्ट सभागृह, एम.जी.एम. कॅम्पस येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मा. के.एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना विशेष पोलीस महानिरीक्षक औरंगाबाद परिक्षेत्र यांचे प्रमुख मार्गदर्शनाखाली तर जिल्हाधिकारी मा. श्री. सुनिल चव्हाण यांचे अध्यक्षतेखाली व मा. मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक, मा. डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक यांचे उपस्थितीत जिल्हातील सर्व समाजातील प्रतिष्ठित नागरिक, स्थानिक लोकप्रतिनिधी, पोलीस पाटील, शांतता समिती सदस्य, माध्यम प्रतिनिधी इत्यादी उपस्थित होते.

 

याबैठकीचे प्रस्ताविक  डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक, यांनी करून बैठकीचा उद्देश व सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करतांना गणेश मंडळांनी व नागरिकांनी प्रशासनाचे नियंमाचे पालन करून सुरक्षित व जल्लोषपुर्ण गणेशोत्सव साजरा करण्यातबाबत सुचना दिल्या. यात प्रामुख्याने श्री मुर्ती ची प्रतिष्ठापणा करण्यापुर्वी गणेश मंडळांनी ऑनलाईन पध्दतीने स्थानिक पोलीस ठाण्याची परवानगी घेणे अत्यावश्यक आहे. तसेच वॉटर प्रुफ मंडपाची व्यवस्था करून मंडप हा वाहतुकीस अडथळा करेल किंवा वाहतुकीची कोंडी निर्माण होईल अशा पध्दतीने रस्त्यावर टाकु नये. श्री मुर्ती ज्याठिकाणी स्थापन होणार आहे ती जागा ही संपुर्ण पणे लाकडी बॅरेकेटींग करून घेणे अत्यावश्यक आहे जेणे करून श्रीमुर्ती जवळील खाद्यपदार्थ खाण्यासाठी कोणातेही मोकाट जनावरे प्रवेश करून शकणार नाही. ज्यामुळे श्री मुर्तीचे पावित्र्यास धोका निर्माण होणार नाही. ध्वनी प्रदुषणांचे नियंमाचे काटेकोरपणे पालन करणे अत्यावश्यक आहे. याचे उल्लंघन झाल्यास गणेश मंडळांना कायदेाशिर कारवाईस सामोरे जावे लागेल. गणेश मंडळ परिसरात सी.सी.टी.व्ही. कॅमेरा लावावा. पारंपारिक वाद्यांचा वापर करणे गरजेचे आहे. गणेश मंडळांनी बॅनर लावलेले असल्यास उत्सव संपताच स्वत: हुन काढुन घ्यावे. तसेच गणेश मंडळ परिसरात स्वच्छता राखावी यासाठी गणेश मंडळांनी स्वयंसेवकांनी नियोजन करावे. इत्यादी सुचना यावेळी संबधीताना करण्यात आल्या आहेत.

 

मा. विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी मार्गदर्शन करतांना हा गणेशोत्सव भक्तीभावाने व उत्साहाने साजरा करतांना नियंमाचे पालन करणे आवश्यक असल्याचे सांगितले, गणेश मंडळांनी नियमांचे पालन केल्यास पोलीसांवरील भार कमी होण्यास मदत होते. तसचे सर्वच गणेश मंडळानी सी.सी.टी.व्ही. कॅमेरे हे सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातुन बसवणे आवश्यक असुन याकरिता गणेश मंडळांना हा जास्त खर्चीक नसल्याचे मत व्यक्त केले आहे.

 

मा. पोलीस अधीक्षक यांनी गणेशोत्सवाचे अनुषंगाने नागरिकांच्या सुचना समजावुन घेऊन त्या निश्चीत पणे सोडवीण्यात येईल असे आश्वासन देऊन गणेशोत्सवा दरम्यान गणेशमंडळ पदाधिकारी यांनी नियमांचे पालन करने अत्यावश्यक असुन या संपुर्ण कालावधीत गणेश मंडळांनी त्यांना स्वयंसेवक हे दिवस व रात्र पाळीत विभाजीत करून त्यांची नावे संबधीत स्थानिक पोलीस ठाण्यात द्यावी. जेणे करून कोणताही अनुचित प्रकारास वेळीच आळा घालणे शक्य होईल. तसेच समाजविद्यातक कृत्य करणा-या कोणत्याही व्यक्तीची गय केली जाणार नसुन अशा व्यक्ती विरोधात कडक कायदेशिर कारवाई करण्यात येईल. तसेच गणेशमंडळात किंवा परिसरात बसुन जुगार खेळणा-याची सुध्दा गय केली जाणार नाही अशा विरोध्दात जुगार कायद्यान्चये गुन्हे दाखल करण्यात येईल.

या गणेशोत्सवात गणेश मंडळांनाची महत्वपुर्ण जबाबदारी असुन त्यांनी ती व्यवस्थीत पाळल्यास पोलीसांना सुध्दा हा गणेशोत्सवाचा आनंद घेऊन साजरा करता येणे शक्य होईल मत मांडले आहे.

 

तसेच मा. जिल्हाधिकरी यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना सांगितले कि, कोणताही उत्सव साजरा करतांना समाज चांगला राहिला पाहिजे याचा विचार करून पुढे जाणे आवश्यक आहे. श्री गणेश ही बुध्दी, ज्ञान, व दुरदृष्टी असलेले देवताचे रूप आले त्यामुळे आपण सुध्दा या गुणांचा अवलंब करून चांगल्या गोष्टी स्विकारून व वाईट गोष्टी सोडुन चांगल्या विचारांनी हा गणेशोत्सव साजरा करू या. शक्ती बरोबर आपल्या विचारात लवचिकता असने सुध्दा आवश्यक आहे. यादरम्यान कोणीही गैरसमजातुन अफवा पसरवु नये. माहिती मिळाल्यास पोलीसांना द्यावी. तसेच या गणेशोत्सवा दरम्यान सामाजिक उपक्रम राबवावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

 

या बैठकीचे सुत्रसंचलन डॉ. विशाल नेहुल उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी केले असुन बैठकीस सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी ,प्रभारी अधिकारी, शाखा अधिकारी, यांचे सह 300 ते 350 जण उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम