स्टेट बँकेसोबत करा व्यवसाय ; जाणून घ्या सविस्तर !
दै. बातमीदार । ६ जून २०२३ । तुम्ही जर एखादी व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर हि बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहे. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने एटीएमची फ्रँचायझी देण्यासाठी अर्ज सादर केले आहेत. त्यातील अटींची पूर्तता करुन तुम्हालाही घरबसल्या मासिक ५० हजार रुपये कमावता येतील.
देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने एटीएमची फ्रँचायझी देण्यासाठी अर्ज सादर केले आहेत. कारण देशभरात बँकांच्या शाखांच्या तुलनेत एसबीआय एटीएमची संख्या तुलनात्मक कमी आहे. त्यामुळे बँकेने थेट लोकांनाच यासंदर्भात साद घातली आहे. त्यामुळे बँकेच्या नियमांची पूर्तता करुन तुम्हालाही घरबसल्या एसबीआय एटीएमची फ्रँचायसी विकत घेता येईल.
जर तुम्हाला एसबीआय एटीएम बसवायचे असेल तर, तुम्हाला तीन कंपन्याशी संपर्क करावा लागेल. या कंपन्यांच्या यादीत टाटा इंडिकॅश, मुथुट एटीएम आणि इंडिया वन एटीएमचा समावेश आहे. बँकेच्या वतीने या कंपन्या एटीएम बसवण्याचे काम करतात. जर तुम्ही एटीएम बसवण्यास इच्छुक असाल तर तुमच्याकडे ५० ते ८० चौरस मीटर जागा असावी. तसेच, तुमच्या ठिकाणाभोवती १०० मीटर अंतरावर दुसरे कोणतेही एटीएम नसावे.
तुमची जागा रहदारीच्या ठिकाणी असावी. याशिवाय या भागात १ किलोवॅट वीज जोडणीही असावी. जर तुमच्याकडे हे सर्व असेल तर तुम्ही वर नमूद केलेल्या तिन्ही कंपन्यांना अर्ज करू शकतात. हा अर्ज ऑनलाइनही करता येतो. जेथे एटीएम बसवले आहेत, तिथे कनेक्टिव्हिटीसाठी व्ही-सॅट देखील स्थापित केले जाते. अशा परिस्थितीत तुमच्या मालमत्तेचे छप्पर मजबूत असले पाहिजे आणि त्यासाठी आवश्यक संस्थेचे ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागेल.
भरपूर कमाई!
एकदा एटीएम स्थापित झाल्यानंतर प्रत्येक व्यवहारावर तुमची कमाई सुरू होते. प्रत्येक रोख व्यवहारावर तुम्हाला ८ रुपये मिळतात. त्याच वेळी, प्रत्येक नॉन-कॅश व्यवहारावर तुम्हाला २ रुपये मिळतात. नॉन कॅश ट्रान्झॅक्शन म्हणजे शिल्लक तपासणे, मिनी स्टेटमेंट घेणे यांचा समावेश असतो.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम