मुलाचा एन्काउंटर करू नये ; आईने दिली प्रतिक्रिया !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १४ ऑक्टोबर २०२३

राज्यात दोन दिवसापासून सुरु असलेल्या ललित पाटील प्रकरणी आता ललित पाटील यास जिथे असेल तिथे पकडावे, आमचे सर्व सहकार्य राहील. मात्र, त्याचा एन्काउंटर करू नये, असे ललित पाटीलच्या आई भाग्यश्री पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

उपनगर येथे राहणाऱ्या श्रीमती पाटील म्हणाल्या, की गुरुवारी दि.१२ रोजी साध्या वेशातील दोन पोलिस कर्मचारी आले होते. त्यातील एक पोलिस खाली उभा होता; तर दुसरा जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट घालून घरी आला. त्याने ललित पाटीलला पोलिस शोधत असून, त्याचा एन्काउंटर करणार असल्याची माहिती दिली. या सर्व प्रकरणामागे राजकारण असून, माझ्या मुलाचा एन्काउंटर होऊ शकतो, याची मला भीती वाटत आहे. ललितचा एन्काउंटर करू नये, असे ललित आणि भूषण या सख्ख्या भावांच्या आई भाग्यश्री पाटील यांनी सांगितले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम