गुढीपाडव्याला कुणालाही देवू नका या वस्तू !

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २२ मार्च २०२३ ।  हिंदू धर्मातील नव्या वर्षाला आजपासून गुढी पाडव्याच्या मुहूर्ताने सुरुवात होत असते. तेव्हा नवीन वर्षात तुम्हाला सुख समाधानाने जगता यावे यासाठी काही गोष्टींची आवर्जून खबरदारी घ्यावी. गुढी पाडव्यानंतर सुरु होणाऱ्या नवीन वर्षात घरातील काही गोष्टी अजिबात कोणालाही द्यायच्या नसतात. या वस्तूंसोबत आपलं भाग्य जोडलेलं असतं. तेव्हा या गोष्टी इतरांना देऊन तुम्ही तुमचं भाग्य त्यांना देत असता. असे केल्याने तुमच्या घरात ताणतणाव वाढेल.

घरात क्लेश निर्माण होईल. तेव्हा या गोष्टी कोणत्या ते आपण जाणून घेऊया.नव्या वर्षाला घरी मिठाई आणा. त्याचा प्रसाद देवापुढे ठेवा. नंतर घरातील सगळ्या सदस्यांना हा प्रसाद वाटा. असे केल्याने वर्षभर तुमच्या कुटुंबात सुखसमृद्धी राहील. गुढी पाडव्याच्या दिवशी चुकूनही काळ्या रंगाचे कपडे घालू नये. काळ्या रंगाऐवजी लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे घालावे. या दिवशी घरात लख्ख प्रकाश असावा. तसेच पाकिटात नव्या, कोऱ्या करकरीत नोटा नक्की ठेवा.

या गोष्टी चुकूनही कोणाला देऊ नका
दही
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी कोणालाही दही देऊ नये. ती व्यक्ती कितीही जवळची असली तरी त्याला दही देऊ नका.

मीठ
मीठ ही अशी वस्तू आहे जी उसनी कधीही कोणाला देऊ नये.

तांदूळ
वेगवेगळे उपाय तोटके करताना तांदूळ वापरले जातात. खूप प्रयत्न करूनही खरात पैसा टिकत नसेल तर तांदूळही कोणाला देऊ नका.

१ रुपयांचा सिक्का
तुम्हीही केलेल्या कमाईतील एक रुपयाचा सिक्का कोणालाही देऊ नका.

घरात तुटक्या फुटक्या वस्तू असतील तर त्या बाहेर काढा. त्याने नकारात्मक उर्जा घरात वास करते. तुमच्या घरातील तिजोरी, कपाट, ड्रॉवर उघडे ठेवू नका. वर्षाच्या पहिल्या दिवशी घरातील जी लक्ष्मी आहे ती कपटातच ठेवा. कपाट सतत उघडे ठेवू नका.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम