रात्री वाईट स्वप्न पडू नये; म्हणून ‘हे’ करून पहा

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २९ ऑक्टोबर २०२२ । भरपूर लोकांना रात्री – अपरात्री विचित्र स्वप्ने पडत असतात, जणू त्यांच्या मागे हिंस्र प्राणी लागला आहे; ते धावत आहेत, पण पाय चालत नाहीत. एखाद्या चक्रव्यूहात अडकले, तेथून बाहेर पडण्याचा कोणताच मार्ग दिसत नाही. अशा प्रकारची वाईट स्वप्ने येणे सामान्य बाब आहे. मात्र, काही लोक यामुळे इतके त्रस्त होतात की, ते अनिद्रा, चिंता व तणावाचे शिकार होतात.

लागोपाठ एक आ‌ठवडा ही स्थिती असेल तर काहीतरी चुकीचे होत असल्याचा भास मनाला होतो. मात्र, जीनिव्हा विद्यापीठात नुकत्याच झालेल्या संशोधनादरम्यान एका म्युझिक थेरपीचा शोध लागला. या थेरपीमुळे वाईट स्वप्ने येण्याचे प्रमाण चारपट कमी होऊ शकते. संशोधनानुसार, रात्री झोपताना संगीत ऐकल्याने वाईट स्वप्नांचे चांगल्या स्वप्नांत रूपांतर होते. तर चांगली झोपही येते. झोपेत लोकांच्या भावनांवर नियंत्रण मिळवण्याचे काम संगीत करते. ज्यांना आठवड्यातून कमीत कमी एकदा वाईट स्वप्ने येतात अशा लोकांवर ही थेरपी परिणामकारक ठरली. वाईट स्वप्नांपासून सुटका करून घेण्यासाठी लोक म्युझिक थेरपीच्या माध्यमातून भावनिकदृष्ट्या मजबूतही झाले आहेत.

संशोधकांनी यास इमॅजिनरी रिहर्सल थेरपीही (आयआरटी) म्हटले आहे. अमेरिकन अकॅडमी ऑफ स्लीप मेडिसिनच्या मते, अमेरिकेचे ४० टक्क्यांपेक्षा अधिक लोक वाईट स्वप्नांमुळे त्रस्त आहेत. प्रमुख संशोधक डॉ. लॅम्प्रोस पेरोग्रामरोस यांच्या मते, हा औषधी न घेता सर्वात प्रभावी उपचार आहे. एक दिवसाच्या सरावाने कमी होऊ शकतात वाईट स्वप्ने इमॅजिनरी रिहर्सल थेरपीत चार टप्पे असतात. ते एका दिवसात पूर्ण करता येतात. लोकांना आपल्या वाईट स्वप्नांचा प्रत्येक तपशील लिहायला सांगितले जाते. तसेच वाईट स्वप्ने सकारात्मक पद्धतीने लिहायला सांगितले जाते, जेणेकरून सुखद व सक्षम उपाय मिळू शकेल.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम