दादांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू नका ; भाजप प्रदेशाध्यक्ष !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १८ एप्रिल २०२३ ।  राज्याच्या राजकारणात सध्या विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या आजूबाजूला फिरत आहे. यावर अनेक नेते टीका टिपण्णी करीत आहे तर काही नेते अजित पवारांची साथ देखील देत असतांना दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याकडून कुठलाही अधिकृत प्रस्ताव आलेला नाही. त्यांना वारंवार आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू नका, असे आवाहन मंगळवारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. ते मुंबईत बोलत होते.

अजित पवार भाजपमध्ये प्रवेश करणार, अशा चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहेत. या चर्चांना आज स्वतः अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत पूर्णविराम दिला. जीवात जीव असेपर्यंत आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन मंगळवारी दुपारी आपली भूमिका मांडली. त्यानंतर तातडीने काही वेळात भाजपकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेतली. बावनकुळे म्हणाले, अजित पवारांकडून भाजपकडे कुठलाही अधिकृत प्रस्ताव नाही. अजित दादांच्या प्रतिष्ठेला डॅमेज करायचा विषय नाही. मात्र, एखादी घटना गतकाळात घडली असेल. ती कशामुळे घडली, तर आमच्याशी विश्वासघात झाला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे म्हणून जनतेने बहुमत दिले. त्यामुळे पुढल्या साऱ्या घटना घडल्या. त्यात देवेंद्रजींची चूक नाही. तो अपरिहार्य निर्णय होता. त्या काळातला तो निर्णय घेऊन अजित पवारांना वारंवार आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू नये. त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे करू नये, असे आवाहन त्यांनी केले.

चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले की, संजय शिरसाट, अजित पवार काय बोलले याबद्दल माझ्याकडे टिपण्णी नाही. आमच्याकडे अधिकृतपणे कुठला प्रस्ताव नाही. कुणाच्याही जीवनात जर तरला काहीच अर्थ नसतो. निकाल काय येईल, सुप्रीम कोर्टाच्या निकालावर जर तर म्हणणे योग्य नाही. आम्ही 2047 चा विचार केलाय आम्ही.
जगातला सर्वोत्तम देश मोदीच करू शकतात. आम्हाला समर्थन मिळते आहे. महाराष्ट्रात समर्थन मिळते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विकासकामावर आम्ही पुढे जातोय. माझी अजित पवारांची भेट नाही. त्यामुळे ते अस्वस्थ की आनंदात मला काय माहिती, असे म्हणत त्यांनी उत्तर देणे टाळले. तसेच 2024 मध्ये महाविजय मिळवू. प्रत्येकाचे पक्ष वाढवण्याचे काम सुरू आहे. फडणीस यांच्या नेतृत्वात पक्षप्रवेशासाठी अनेकांनी रांगा लावल्याचे त्यांनी सांगितले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम