
दै. बातमीदार । २८ मे २०२३ । आपण नेहमी दिवसभर थकवा झाल्यावर रात्री उशिरापर्यत जागे असतो त्यामुळे सकाळी लवकर झोप उघडत नाही तर दिवसभर थकवा किंवा सुस्तीतून जायचे नसेल तर सकाळपासूनच उपाय करावे लागतील. झोपेतून उठून नवी जीवनशैली स्वीकारावी लागेल. जाणून घेऊया सविस्तर.
सकाळी उठल्यानंतर आधी वॉशरूममध्ये जाऊन फ्रेश व्हा आणि मग लगेच मॉर्निंग वॉकला निघा, 30 मिनिटं ते एक तास चाललो तर शरीराला थोडी ऊर्जा मिळेल.
सकाळी 15 मिनिटे चालल्यास तुमचे मानसिक आरोग्य चांगले राहील कारण इस्ट्रोजेन आणि डोपामाइन सारख्या हॅपिनेस हॉर्मोन्सची पातळी वाढेल आणि तुम्हाला टेन्शन देणाऱ्या कोर्टिसोल हार्मोन्सची पातळी कमी होईल. हे आपल्याला तणावापासून वाचवेल, जे दिवसभराच्या थकव्याचे एक प्रमुख कारण असू शकते.
सकाळी उठून चालल्याने तुमच्या स्नायूंना आणि हाडांना कमालीची ताकद मिळते, ज्यामुळे थकवा आणि अंगदुखीची समस्या कमी होते. मॉर्निंग वॉकचा चांगल्या झोपेशी थेट संबंध आहे. जर तुम्ही रात्री शांत झोप घेत असाल तर दिवसा थकवा नगण्य राहील.
हल्ली लहान-मोठ्या सर्वच शहरांतील बहुमजली इमारतींमध्ये लिफ्टचा वापर खूप जास्त आहे, सोयीस्कर आहे, पण लिफ्टचा वापर माणसाला खूप आळशी बनवतो. पण तुम्ही सकाळी उठून किमान 10 ते 15 मिनिटं पायऱ्या चढा असे केल्याने आपल्या शरीरातील रक्ताभिसरण वाढेल. पाणी प्यायल्याशिवाय हे काम करू नका.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम