गाडीची टाकी फुल करण्यापूर्वी जाणून घ्या पेट्रोल-डीझेलचे दर !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २३ फेब्रुवारी २०२३ । अमेरिकन फेडरल रिझर्व्हने महागाई आटोक्यात आणण्यासाठी आणि डॉलर मजबूत करण्यासाठी कंबर कसली आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या 24 तासात कच्चा तेलाचे भाव गडगडले. केंद्रीय बँकेने व्याजदर वाढवले आहेत. कच्चा तेलासह सोने आणि चांदीवर त्याचा दबाव दिसून येत आहे. कच्चा तेलात 24 तासात 2 डॉलरही जास्त घसरण झाली. या मोठ्या घसरणीमुळे अगोदरच कमी असलेल्या किंमती अजून खालच्या स्तरावर पोहचल्या आहेत. ब्रेंट क्रूड ऑईलचा भाव जवळपास 2 डॉलरने घसरत 80.67 डॉलर प्रति डॉलरवर पोहचला. डब्ल्यटीआई ऑईलमध्ये ही 2 डॉलरपेक्षा अधिकची घसरण दिसून आली. हे भाव 74.04 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले. कच्चा तेलाचे दर गेल्या महिन्याभरापासून घसरणीवर असताना आता देशात पेट्रोल-डिझेलचे दर कधी कमी होतील, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

अमेरिकेत इंधनाची मागणी वाढण्याची शक्यता आहे. तर चीन पण तेल आयातीवर भर देत आहे. भारतही या स्पर्धेत आहे. तज्ज्ञांच्या मते येत्या काही दिवसांत कच्चा तेलाच्या किंमती भडकूही शकतात. पण भारताच्या रणनीतीमुळे अमेरिकेच्या धोरणाचा भारतावर परिणाम होणार नसल्याचा तज्ज्ञांचा दावा आहे. भारत रशियासह इतर देशांकडून कच्चा तेलाची खरेदी करत आहे. 2006-07 मध्ये भारत 27 देशांकडून इंधन आयात करत होता. 2021-22 मध्ये ही संख्या 39 इतकी झाली आहे. भारतीय तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी सहा वाजता इंधनाचे नवीन दर जाहीर करण्यात येतात. त्याआधारे देशात विविध भागात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.

राज्यातील प्रमुख शहरातील पेट्रोल-डिझेलच्या आजच्या किंमती
मुंबई
पेट्रोल 106.31 प्रति लिटर
डिझेल 94.27 प्रति लिटर

अहमदनगर
पेट्रोल 106.53 प्रति लिटर
डिझेल 93.03 प्रति लिटर

अकोला
पेट्रोल 106.66 प्रति लिटर
डिझेल 93.19 प्रति लिटर

अमरावती
पेट्रोल 107.15 प्रति लिटर
डिझेल 93.66 प्रति लिटर

औरंगाबाद
पेट्रोल 107.71 प्रति लिटर
डिझेल 94.17 प्रति लिटर

नागपूर
पेट्रोल 106.45 प्रति लिटर
डिझेल 92.99 प्रति लिटर

नांदेड
पेट्रोल 108.32 प्रति लिटर
डिझेल 94.78 प्रति लिटर

जळगाव
पेट्रोल 106.46 प्रति लिटर
डिझेल 92.98 प्रति लिटर

नाशिक
पेट्रोल 106.65 प्रति लिटर
डिझेल 93.15 प्रति लिटर

लातूर
पेट्रोल 107.89 प्रति लिटर
डिझेल 94.36 प्रति लिटर

कोल्हापूर
पेट्रोल 106.06 प्रति लिटर
डिझेल 92.61 प्रति लिटर

पुणे
पेट्रोल 106.59 प्रति लिटर
डिझेल 93.09 प्रति लिटर

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम