बँकेतील कामे लवकर करा ; एप्रिल महिन्यात इतके दिवस असणार बंद !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २५ मार्च २०२३ ।  राज्यात आर्थिक वर्ष म्हणून मार्च महिना हा ओळखला जात असतो. येत्या चार ते पाच दिवसात मार्च महिना संपत आला आहे. यानंतर, पुढील महिना एप्रिल सुरू होईल, ज्यामध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल लागू होणार आहेत. यासोबतच बँकांच्या सुट्ट्यांची यादीही जाहीर करण्यात आली आहे. जर तुमचे बँकिंगशी संबंधित कोणतेही काम असेल, तर या सुट्टीनुसार तुम्ही तुमचे नियोजन करू शकता. बँकिंग हॉलिडे कॅलेंडरनुसार, एप्रिलमध्ये 15 दिवस बँका बंद राहतील, त्यात प्रादेशिक आणि राष्ट्रीय सुट्ट्यांसह, दुसरा आणि चौथा शनिवार आणि रविवार यांचा समावेश आहे.

एप्रिलमधील बँका म्हणजे, महावीर जयंती, बाबू जगजीवन राम यांचा जन्मदिवस, गुड फ्रायडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, संक्रांती/बिजू उत्सव/बिसू उत्सव, तामिळ नववर्ष दिन, विशू/बोहाग बिहू, बंगाली नववर्ष दिन (नब्बर्ष), शब-एल. – कादर, ईद-उल-फित्र (रमजान ईद)/गरिया पूजा/जुमत-उल-विदा आणि रमजान ईद (ईद-उल-फित्र) या दिवशी बंद राहतील.

इतक्या दिवस बंद राहणार बँका
1 एप्रिल (शनिवार) – वार्षिक खाती बंद झाल्यामुळे (मिझोरम, चंदीगड, मेघालय आणि हिमाचल प्रदेश) वगळता बँका बंद राहतील.
4 एप्रिल (मंगळवार) – महावीर जयंतीनिमित्त गुजरात, मिझोराम, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, चंदीगड, तामिळनाडू, राजस्थान, लखनौ, नवी दिल्ली, छत्तीसगड, झारखंड या राज्यांमध्ये बँका बंद राहणार आहेत.
5 एप्रिल (बुधवार) – बाबू जगजीवन राम यांच्या जयंतीनिमित्त हैदराबादमध्ये बँका बंद राहणार आहेत.
7 एप्रिल (शुक्रवार) – गुड फ्रायडे निमित्त त्रिपुरा, गुजरात, आसाम, राजस्थान, जम्मू, हिमाचल प्रदेश, श्रीनगर वगळता बहुतांश राज्यांमध्ये बँक सुट्टी असेल.
14 एप्रिल (शुक्रवार) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती/बोहाग बिहू/चिरावबा/वैसाखी/बैसाखी/तमिळ नववर्ष दिन/महाविसुभा संक्रांती/बिजू उत्सव/बिसू उत्सव या दिवशी बँका बंद राहतील.
15 एप्रिल (शनिवार) – त्रिपुरा, आसाम, केरळ, बंगाल, हिमाचल प्रदेशमध्ये विशू / बोहाग बिहू / हिमाचल दिन / बंगाली नववर्ष दिन (नबवर्ष) निमित्त बँका बंद आहेत.
18 एप्रिल (मंगळवार) – शब-ए-कदरा – जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँका बंद राहतील.
21 एप्रिल (शुक्रवार) – त्रिपुरा, जम्मू आणि श्रीनगर, केरळमध्ये ईद-उल-फित्र (रमजान ईद)/गरिया पूजा/जुमत-उल-विदा निमित्त बँका बंद आहेत.
22 एप्रिल (शनिवार) – रमजान ईद (ईद-उल-फित्र) आणि चौथ्या शनिवारी बँका बंद राहतील.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम