या महिन्यात करून घ्या काम ; एप्रिल महिन्यात इतके दिवस बँक बंद !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १२ मार्च २०२३ । यंदाच्ये आर्थिक वर्ष २०२२-२३ संपणार आहे. तर ३१ मार्चनंतर, १ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या नवीन आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये काही मोठे बदल होतील. हे बदल थेट पैसा आणि बँकांशी संबंधित आहेत.

सर्व बँक ग्राहकांना एप्रिल 2023 मध्ये येणार्‍या बँकेच्या सुट्ट्यांची माहिती असावी. तुमचेही एप्रिलमध्ये बँकेशी संबंधित काही काम असेल तर तुम्ही आत्तापासूनच प्लॅन करू शकता. अशा परिस्थितीत, तुम्हाला वेगवेगळ्या राज्यांमधील बँक सुट्ट्यांबद्दल देखील माहिती असणे आवश्यक आहे.

देशातील बहुतांश बँकांचे काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) द्वारे नियंत्रित केले जाते. रिझव्‍‌र्ह बँकेच्या (आरबीआय) संमतीनंतर बँकांच्या सुट्या निश्चित केल्या जातात. महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवार व्यतिरिक्त रविवारी सरकारी आणि खाजगी बँका काम करत नाहीत. पुढील महिन्यात एप्रिलमध्ये 15 दिवसांची सुट्टी असेल. आरबीआयच्या आदेशानुसार, एप्रिल 2023 मध्ये, बँका दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारसह रविवारसह एकूण 15 दिवस बंद राहतील.

एप्रिल महिन्यातील पहिली सुट्टी १ एप्रिल रोजी बँक खाती वार्षिक बंद झाल्यापासून सुरू होईल. 4 एप्रिल रोजी महावीर जयंतीची सुट्टी असेल. संपूर्ण महिनाभर बँकेच्या कामकाजात कोणतीही अडचण येणार नाही. या कालावधीत एटीएम, रोख ठेव, ऑनलाइन बँकिंग आणि मोबाइल बँकिंग सुरू राहतील. सुट्ट्या राज्यानुसार बदलू शकतात आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, रविवार व्यतिरिक्त महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारीही बँका बंद असतात. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायद्यांतर्गत, RBI ने 1, 4, 5, 7, 14, 15, 18, 21 आणि 22 एप्रिल रोजी बँक सुट्टी जाहीर केली आहे. याशिवाय एप्रिलमध्ये 2, 9, 16 एप्रिल रोजी 5 रविवार येत आहेत. 8 आणि 22 एप्रिलला दुसरा आणि चौथा शनिवार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम