हिवाळ्यात केस मजबूत ठेवण्यासाठी या गोष्टी कराच !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ५ जानेवारी २०२३ नेहमीच हिवाळ्यात आपल्या विविध समस्यांचे तोंड द्यावे लागते. यातच कोंड्याच्या समस्येने अनेक लोकांना त्रास होतो. कोंड्याचा त्रास टाळण्यासाठी काही लोक केमिकलयुक्त सौंदर्य उत्पादनांचा वापर करतात. मात्र या गोष्टींचा परिणाम फार काळ दिसून येत नाही. अशा वेळी तुम्ही काही आयुर्वेदिक उपाय देखील करू शकता. यामुळे कोंड्याची समस्या दूर होण्यास मदत होईल. तसेच या गोष्टींच्या वापरामुळे केसांशी संबंधित इतर अनेक समस्या दूर करण्यास मदत करतील. तसेच केस मजबूत आणि निरोगी होतील.

कडुलिंब

केसांसाठी तुम्ही कडुलिंबाची पाने अनेक प्रकारे वापरू शकता. कडुलिंबाचे तेल तयार करून वापरू शकता. तसेच शांपूचा वापर केल्यानंतर तुम्ही केस कडुलिंबाच्या पाण्यानेही धुवू शकता. यासाठी कडुलिंबाची पाने पाण्यात उकळावी व ते पाणी काही काळ असेच राहू द्यावे. केसांना शांपू केल्यानंतर या पाण्याने केस धुवावे. यामुळे कोंड्याची समस्या दूर होण्यास मदत होईल. केसांसाठी कडुलिंबाची पेस्टही वापरू शकता. यासाठी कडुलिंबाच्या पानात पाणी घालून पेस्ट तयार करा. केस शांपून धुण्याापूर्वी काही काळ ही पेस्ट केसांना लावून ठेवावी. नंतर केस स्वच्छ धुवावेत.

कोरफड

कोरफडीचा वापर अनेक प्रकारच्या सौंदर्य उत्पादनांमध्ये केला जातो. कोंड्याचा त्रास दूर करण्यासाठी तुम्ही कोरफडीचा वापरही अनेक प्रकारे करू शकता. यासाठी एका भांड्यात कोरफडीचे जेल घ्या, त्यात दही घालावे. या दोन्ही गोष्टी मिक्स करून काही वेळ केसांवर लावून ठेवा. नंतर शांपूने केस धुवा.

लिंबू

लिंबामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणा असते, त्यामुळे इम्युनिटी वाढते. कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही लिंबाचाही वापर करू शकता. यासाठी एका भांड्यात 2 ते 3 चमचे खोबरेल तेल घ्यावे, त्यामध्ये लिंबाचा रस घालावा. या दोन्ही गोष्टी मिसळून स्काल्प व केसांना लावून काही वेळ मसाज करावा. थोड्यावेळावे केस सौम्य शांपूने धुवावेत. तुम्ही हे आठवड्यातून 2 ते 3 वेळा वापरू शकता.

मेथी
मेथी ही केवळ आरोग्यासाठी नव्हे तर केसांसाठीही खूप फायदेशीर ठरते. त्याचा वापर करण्यासाठी एका वाटीत मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी उठल्यावर मेथी बारीक करून पेस्ट बनवा. नंतर त्यामध्ये थोडे दही मिसळा. हे दोन्ही एकत्र करून टाळूला लावावे व थोडा वेळ राहू द्या. यानंतर केस सौम्य शांपूने धुवावेत. यामुळे तुमचे केस मऊ आणि कोंडा मुक्त होण्यास मदत होईल.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम