थंडीत स्कीन मऊ बनविण्यासाठी ‘या’ गोष्टी करा

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २८ ऑक्टोबर २०२२ । राज्यात सर्वत्र थंडीची सुरुवात झाली आहे, त्यामुळे स्कीन कोरडी आणि रूक्ष होते. त्यामुळे चेहऱ्यावर सुरकूत्या येतात, काळवंडतो. चेहऱ्याचं सौंदर्य कमी होतं. त्यामुळे चेहऱ्याच्या त्वचेच्या एक्स्ट्र केअरची आवश्यकता असते. थंडीत आपल्या चेहऱ्याची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असते. पण ही केअर कशी करावी? जाणून घ्या.

खोबऱ्याचं तेल – थंडीत चेहऱ्यावर नारळाचं तेल पण लावता येतं. खोबऱ्याच्या तेलात मॉइश्चरायझिंग गुण असतात. त्यामुळे थंडीत खोबऱ्याचं तेल लावलं तर बराच फायदा होतो. खोबऱ्याच्या तेलाने त्वचा कोमल होते आणि कोरडेपणा आणि रूक्षपणा कमी होतो.

पपई – पपईमध्ये भरपूर पोषक तत्वे असतात. पपई चेहऱ्याला नरिश आणि मॉइश्चराइज करते. यासाठी एक पिकलेली पपई घ्या. ती चांगली मॅश करा. आता ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्याला लावा. १५-२० मिनीटानंतर चेहरा धुवा. तुम्हाला हवं तर त्यात कच्च दूध पण मिक्स करू शकतात

चंदन पावडर – चंदन पावडर थंडीत लावता येऊ शकते. चंदन थंड असतं त्यामुळे त्वचेसाठी त्याचा चांगला फायदा होतो. चंदर पावडरमध्ये बेसन पिठ, गुलाब जल मिक्स करून ती पेस्ट चेहऱ्यावर लावून १५-२० मिनीटं ठेवा आणि धुवून घ्या. असं आठवड्यातून २-३ वेळा केल्यानं निश्तेज चेहऱ्यावर तेज जाणवतं.

गुलाबाच्या फुलांची पावडर – गुलाबाच्या फुलांची पावडरपण चेहऱ्याच्या स्कीनला नरिश करण्यासाठी मदत करू शकेल. यासाठी पहिले गुलाबाच्या फुलांना सुकवून पावडर बनवा. त्यात गुलाब जल किंवा एलोवेरा जेल मिक्स करा. ही पेस्ट थंडीत चेहऱ्यावर लावा. २० मिनीटांनी चेहरा धुवा. तुम्ही ही पेस्ट रोज लावू शकतात. यामुळे रंग उजळतो. चेहऱ्यावरचे डाग जातात. त्वचा मऊ होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम