आधार कार्डला १० वर्ष झाले तर हे कराच !
दै. बातमीदार । २१ फेब्रुवारी २०२३ । देशात कॉंग्रेसच्या कार्यकाळात देशाच्या प्रत्येक व्य्क्तीचो ओळख असायला हवी यासाठी आधारकार्ड सुरु केले होते. आता त्या योजनेले भरपूर वर्ष झाले पण अद्याप जर तुमचे आधार कार्ड १० वर्ष झाले असतील व तुम्ही जर त्याला अपडेट केले नसेल तर हि बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.
सरकारकडून सांगण्यात आलेय की, ‘तुमचं आधार कार्ड दहा वर्षांपूर्वी तयार करण्यात आलं असेल आणि ते अद्यापही अपडेट केलं नसेल, तर ते तत्काळ अपडेट करा. तसेच ‘ओळखणीचा पुरावा’ आणि ‘पत्त्याचा पुरावा’ ची कागदपत्रे अपलोड करुन व्हेरिफाइड करावीत . ऑनलाइन अपडेट करण्यासाठी 25 रुपये आणि ऑफलाइनसाठी 50 रुपये शुल्क आहे
आधार कार्ड कसं अपडेट करावं? : ऑफलाइन अपडेटसाठी, तुम्हाला तुमच्या जवळच्या आधार केंद्राला भेट द्यावी लागेल. UIDAI नुसार, तुम्ही 50 रुपये शुल्क भरून तुम्ही सहज डेमोग्राफिक डिटेल्स (नाव, पत्ता, जन्मतारीख, लिंग, मोबाइल आणि ईमेल) सहजपणे अपडेट करू शकता. बायोमेट्रिक अपडेटसाठी तुम्हाला 100 रुपये द्यावे लागतील.
ऑनलाइन अॅड्रेस अपडेट करण्याची प्रोसेस काय? : आधार सेल्फ सर्व्हिस अपडेट पोर्टलवर जा आणि ‘प्रोसीड टू अपडेट अॅड्रेस’ या पर्यायावर क्लिक करा. आधार नंबर, रजिस्टर्ड मोबाइल नंबर आणि ओटीपी वापरून लॉगिन करा. ‘पत्ता अपडेट करण्यासाठी पुढे जा’ वर क्लिक करा. 12 अंकी आधार नंबर टाका आणि ‘ओटीपी पाठवा’ वर क्लिक करा. OTP टाका आणि लॉगिन करा. ‘अपडेट न्यू अॅड्रेस प्रूफ’ हा पर्याय निवडल्यानंतर नवीन पत्ता टाका. यानंतर, अॅड्रेस प्रूफ म्हणून सबमिट करावयाची कागदपत्रे सलेक्ट करा. पत्त्याच्या पुराव्याची स्कॅन केलेली कॉपी अपलोड करा आणि ‘सबमिट’ बटणावर क्लिक करा. आधार अपडेट रिक्वेस्ट स्वीकारली जाईल आणि 14-अंकी अपडेट रिक्वेस्ट नंबर जेनरेट होईल.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम