तुम्हाला माहित आहे का ? राखीची लव्ह स्टोरी !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १४ फेब्रुवारी २०२३ । गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत ही तिचा पती आदिल खानसोबतच्या नात्यामुळे चर्चेत होती. राखीनं आदिल खान दुरानीवर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. दरम्यान, राखीनं आदिलबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

राखी सावंतची लव्ह स्टोरी ही खूप कमी लोकांना माहितच नाही आहे. आज व्हॅलेंटाईन डे आहे आणि राखी एकटी पडली आहे. पती रितेशपासून विभक्त झाल्यानंतर राखी आदिलसोबत रिलेशनशिपमध्ये आली होती. त्यानंतर त्यांनी मुस्लिम पद्धतीनं विवाह केला. दोघांनी नेहमीच एकमेकांवरचे प्रेम व्यक्त केले मात्र, आज ते सोबत नाहीत.

राखी सावंत आणि आदिलची भेट ही एका कॉमन फ्रेंडच्या मदतीनं सुरु झाली होती. त्यानंतर दोघं फॅशन शोमध्ये भेटले आणि त्यानंतर त्यांनी नंबर एक्सचेंज केले. आदिलनं सांगितलं की तो राखीशी रात्रभर बोलायचा कारण रितेशपासून विभक्त झाल्यानंतर ती खूप वाईट परिस्थितीत होती. या सगळ्यात त्या दोघांना एकमेकांशी कसे प्रेम झाले हे त्यांना कळलेच नाही.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम