याचा त्रास तुम्हाला हिवाळ्यात होतोय का ?

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १ नोव्हेबर २०२२ राज्यात आता हिवाळ्याची सुरुवात झाली आहे थोड्या फार प्रमाणात थंडी जोर धरू लागली आहे. वातावरणात गारवा निर्माण होण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे शरीर उबदार रहावं म्हणून अनेकजण आपल्याला स्वेटर घातलेला दिसून येतात. मात्र, येवढं सर्व घालूनही किंवा योग्य ती काळजी घेऊनही अनेकांना थंडीचा त्रास होतो. यामध्ये सायनसचा त्रास काहींना हमखास होता. हा त्रास सुरू झाला की अनेकांना बेचैन व्हायला होतं.

सायनमुळे अनेकांना सर्दी, डोकेदुखी आणि वारंवार शिंका येणे तर, काहीजण डोळे दुखण्याची तक्रारदेखील करतात. सायनसमुळे कपाळावर ताण येतो. जर तुम्हालादेखील सायनसचा त्रास असेल तर, डॉक्टारांच्या सल्ल्यासोबत तुम्ही घरच्या घरी एक टिप फॉलो करू शकता. यामुळे तुमचा सायनसचा त्रास कमी होण्यास नक्कीच मदत होईल.

हे सूप ठरेल फायदेशीर
थंडीत होणारा त्रास कमी करण्यासाठी घरच्या घरी तुम्ही एक सूप तयार करू शकता. हे सूप सेवन केल्याने शरीर उबदार राहण्यास मदत होते. यामुळे घसा खवखवणे, सायनसची समस्या दूर होते.

सूपसाठीचे साहित्य
फुलकोबी मध्यम आकाराचा – २ ते ३ बारीक चिरून घ्यावा.
कांदा – २
बारीक चिरलेले आले – १ टीस्पून
ठेचलेली काळी मिरी – 2 ते 3 टीस्पून
हिरवी वेलची – २
लवंग – 2
चवीनुसार मीठ
असे बनाव सूप

सूप बनवण्यासाठी प्रथम एका भांड्यात पाणी घेऊन त्यात सर्व मसाले टाका. यानंतर त्यात चिरलेला कोबी शिजवून घ्या. जोपर्यंत ते सूपासारखे दिसून येत नाही. तोपर्यंत ते मंद आचेवर शिजू द्या.
हे आहेत सूप पिण्याचे फायदे

कोबीपासून तयार केलेले हे सूप केवळ सायनसचा त्रास कमी करते असे नाही. तर, पोटाच्या समस्यादेखील दूर करण्यासाठी प्रभावी आहे. याच्या नियमित सेवनामुळे शरीरातून अतिरिक्त फ्लुएड्स बाहेर पडते.

या सूपात असलेले आले सर्दी, खोकला, सायनस आणि ब्रोन्कियल इन्फेक्शनपासून संरक्षण करते. याशिवाय आल्यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स जळजळ होण्यापासून आराम देतात. तसेच सूज आणि वेदना यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम