दिवाळीत ‘या’ वस्तू चुकुनही आणू नका घरी

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १९ ऑक्टोबर २०२२ । दिवाळी हा सन सर्वासाठी खूप आकर्षणचा असतो, या महिन्यात चुकुनही कुणी दिलेले भेटीत ‘या’ वस्तू दिल्या तर आणू नका घरी त्याने तुमच्या घरात गरिबी येण्यासोबतच नकारात्मक ऊर्जा वाढते. आज आपण अशाच भेटवस्तूंबद्दल जाणून घेणार आहोत ज्या घेणं टाळलं पाहिजे.

वास्तुशास्त्रानुसार सिंह, वाघ, चित्ता इत्यादी प्राण्यांचे चित्र किंवा मूर्ती देणे आणि घेणे शुभ मानले जात नाही. त्यामुळे घरातील लोकांमध्ये कलह निर्माण होतो. घरातील सुख-समृद्धी आणि शांती नष्ट होऊ शकते.

मावळत्या सूर्याचे चित्र
वास्तुशास्त्रानुसार, जर कोणी तुम्हाला मावळत्या सूर्याचे चित्र भेट म्हणून देत असेल तर, ते स्वीकारू नये. कारण यामुळे तुमच्या जीवनात आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात.

चाकू, सुरींसारख्या धारदार वस्तू
वरील वस्तूंशिवाय वास्तुशास्त्रानुसार चाकू, कात्री या सारख्या भेट वस्तू स्वीकारल्याने घरातील सदस्यांमध्ये वादाचे प्रसंग वाढू शकतात. तसेच आर्थिक अडचणींनाही सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे धारदार वस्तू भेटवस्तू म्हणून स्वीकारणे टाळा.

घड्याळे, रुमाल आणि चामड्याच्या वस्तू
वास्तुशास्त्रानुसार, जर कोणी तुम्हाला घड्याळ, रुमाल, बेल्ट, पर्स किंवा चामड्याच्या वस्तू भेट दिल्या तर ते न घेण्याचा सल्ला दिला जातो. वास्तुशास्त्राच्या मान्यतेनुसार, यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये मत्सराची भावना निर्माण होते. घरात सुख-शांती टिकवून ठेवण्यासाठी अशा भेटवस्तू स्वीकारणे टाळावे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम