तरूणामध्ये गैरसमज करू नका ; उपमुख्यमंत्री पवार !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २२ ऑक्टोबर २०२३

राज्यात विरोधकांनी सरकारला नोकरभरती बाबत घेरत असतांना आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांना फटकारले आहे. मी सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून कार्यरत होतो. त्यानंतर विविध नेत्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री, उपमुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. तेव्हापासून राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात भरती झालेली मी पाहिलेली नाही. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि मी दीड लाख तरुण-तरुणींना रोजगार देण्यासाठी नोकरभरती करण्याचा निर्णय घेतला आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी स्पष्ट केले. विरोधक जाणीवपूर्वक कंत्राटी भरतीबाबत युवकांमध्ये गैरसमज पसरवत असल्याचेही पवार यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटी भरतीबाबत सर्व गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. हा निर्णय ज्यांच्या कार्यकाळात झाला, तेव्हा याचा आताएवढा गदारोळ झाला नव्हता. विरोधकांनी जाणीवपूर्वक कंत्राटी भरतीचा बागुलबुवा उभा केला आहे. वास्तविक आताच्या आमच्या सरकारने दीड लाख नोकरभरतीचा निर्णय घेतला आहे. मध्यंतरी आर. आर. पाटील यांच्या काळात ६० किंवा ६५ हजारांची भरती लागोपाठ पाच वर्षांची झाली होती. टाटा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगासारख्या संस्थांना भरतीची जबाबदारी दिली आहे. यातून विशेषतः बेरोजगार तरुणांमध्ये गैरसमज पसरवण्यात आला की, तुमच्या नोकऱ्या काढून घेतल्या जात आहेत. आणि कंत्राटी भरती सुरू आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम