मला विचारता थंडी वाजत नाही का ? ; राहुल गांधी !
दै. बातमीदार । २४ डिसेंबर २०२२ । देशात सुरु असलेली भारत जोडो यात्रा हरीयानातून दिल्लीमध्ये दाखल झाली आहे. राहुल गांधी यांनी लाल किल्ल्यावरुन यात्रेला संबोधित केलं. यावेळी यांनी केंद्र सरकारवर आणि माध्यमांवर आसूड ओढला.
राहुल गांधी म्हणाले की, मी देशामध्ये आतापर्यंत दोन हजार किलोमीटर फिरलो परंतु मला कुठंही हिंसा, द्वेष दिसला नाही. परंतु हे टीव्हीवाले २४ तास हिंसा पसरवित आहेत. जसा खिसेकापू सुरुवातीला आपलं लक्ष दुसरीकडे नेतो, तसंच हे मीडियावाले तुमचा खिसा कापून लक्ष दुसरीकडे वळवत आहेत. पुढे बोलतांना राहुल गांधी म्हणाले की, मीडियावाले मला विचारतात मला थंडी वाजत नाही का? परंतु हाच प्रश्न ते शेतकऱ्यांना का विचारत नाहीत? शेतीत, कंपन्यांमध्ये काम करणारे मजूर यांना हे विचारला जात नाही, हे दुर्दैव आहे. यांना २४ तास फक्त हिंदू-मुस्लिम वाद पाहिजे.
”हिंदू धर्म आणि देवदेवता भिऊ नका, असं सांगतात. परंतु हे भाजपवाले भीतीचं वातावरण तयार करीत आहे. माझ्या यात्रेमध्ये तुम्हाला भीती, हिंसा, धर्म, जात, भेदभाव काहीच दिसलं नसेल. कारण ही यात्राच भीती दूर करण्यासाठी आहे.” सगळ्या कंपन्या त्यांच्या, रेल्वे त्यांची, लाल किल्ला त्यांचा…सर्व त्यांचंच आहे. परंतु आमचं सत्य आहे, असं राहुल गांधी म्हणाले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम