
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे खरे पाईक – ना. श्री. गिरीषभाऊ महाजन
नाशिक येथे प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख अनावधानाने राहून गेल्यानंतर निर्माण झालेल्या वादावर समाजात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. भावना दुखावल्या जाणे स्वाभाविक असले, तरी एका क्षणिक चुकिवरून एखाद्या नेत्याच्या संपूर्ण कार्यकर्तृत्वावर शंका घेणे हे अन्यायकारक ठरते. विशेष म्हणजे, संबंधित प्रकरणावर तात्काळ दिलगिरी व्यक्त करूनही सुरू राहिलेली चर्चा ही दुर्दैवी असल्याची भावना समाजातील अनेक घटकांतून व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर पाहिले असता, गेल्या चार दशकांहून अधिक काळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना कृतीतून अभिवादन करणारे एकमेव लोकनेते म्हणून ना. श्री. गिरीषभाऊ महाजन यांचे नाव आदराने घेतले जाते. दरवर्षी आंबेडकर जयंतीनिमित्त बाबासाहेबांना वंदन करत स्वतः लेझीम नृत्य खेळत रॅलीमध्ये सहभागी होणे, ही त्यांची केवळ परंपरा नसून ती बाबासाहेबांच्या विचारांप्रती असलेली निष्ठा दर्शवते.
निळा शर्ट, निळा रुमाल अभिमानाने मिरवणारे गिरीषभाऊ महाजन हे प्रतीकात्मकतेपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृतीतून आंबेडकरी विचारसरणी जपणारे नेते म्हणून ओळखले जातात. जामनेर शहरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य, प्रेरणादायी स्मारक उभारण्यामागेही त्यांचीच संकल्पना आणि पुढाकार आहे. हे स्मारक केवळ दगड-मातीचे बांधकाम नसून, बाबासाहेबांच्या विचारांचा जिवंत साक्षीदार मानले जाते.
ना. श्री. गिरीषभाऊ महाजन यांनी शब्दांपेक्षा कामावर अधिक भर दिला आहे. सामाजिक न्याय, समता, संधीची समानता आणि सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवणारी व्यवस्था उभी करणे – हे बाबासाहेबांचे विचार त्यांनी सातत्याने प्रत्यक्षात उतरवले आहेत. त्यांच्या राजकीय व सामाजिक वाटचालीतून हे स्पष्टपणे दिसून येते.
आज समाजात अनेक असे तथाकथित पुरोगामी चेहरे आहेत, जे केवळ मंचावर बाबासाहेबांचे नाव घेतात; मात्र प्रत्यक्षात बहुजन समाजाला शिक्षण, रोजगार आणि सन्मानापासून दूर ठेवणाऱ्या व्यवस्थेचा भाग बनलेले दिसतात. अशा दुटप्पी भूमिकेला आंबेडकरी जनतेने आता स्पष्टपणे नकार दिला आहे. आज जनता घोषणा नव्हे, तर परिणाम पाहते; शब्द नव्हे, तर कामावर विश्वास ठेवते.
या साऱ्या पार्श्वभूमीवर पाहता, गिरीषभाऊ महाजन यांनी बहुजन समाजासाठी केलेले कार्य केवळ वर्तमानापुरते मर्यादित राहणार नाही, तर ते इतिहासात नोंदले जाईल, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
म्हणूनच ना. श्री. गिरीषभाऊ महाजन हे केवळ राजकीय नेते नाहीत, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे खरे पाईक आहेत, अशी सर्वसामान्य जनतेची भावना आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम